युरोपात युद्धाचे ढग गडद !
युक्रेनने क्रिमियातील कर्च पूल पाडल्याचा सूड उगवण्यासाठी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह तेथील १० शहरांवर आक्रमण केले, अशी माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली. रशियाने कीववर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे सहस्रो नागरिकांना छावण्या आणि भूमीगत मेट्रोस्थानके येथे आश्रय घ्यावा लागला.