प्रभु श्रीरामाच्या मार्गावरून चालल्यावरच द्वेष नष्ट होईल ! – न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी त्यांच्या सरकारी निवासामध्ये दिवाळीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते म्हणाले की, आपण प्रभु श्रीराम आणि सीता यांच्यानुसार जीवन जगले पाहिजे. दिवाळीच्या वेळी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याचा आपण सर्वांनी निश्‍चय करायला हवा…

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. या कार्याचा आवाका पुष्कळ वाढल्याने वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे सनातनच्या आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.

श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या आणि सात्त्विक सौंदर्याचा आविष्कार असलेल्या सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या मनोहारी दीपरचना !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री ऋद्धि-सिद्धिसहित सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा आश्रमात श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या विविध दीपरचनांद्वारे श्री सिद्धिविनायकाची आराधना करण्यात आली. दिव्यांचा लखलखता प्रकाश लक्ष वेधून घेतो.

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सनातन संस्थेच्या साधिकेचा प्रथम क्रमांक !

या वेळी सनातनच्या साधिका सौ. चैत्राली शुभम वडणगेकर म्हणाल्या, ‘‘निबंध स्पर्धेच्या पूर्वसिद्धतेसाठी मी सनातन संस्थेचा ‘आईचे दूध : भूलोकातील अमृत’ या ग्रंथाचा अभ्यास केला. या ग्रंथामधून अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.’’

निफाड (नाशिक) येथे आयोजित ‘हिंदूसंघटन मेळाव्या’मध्ये सनातनचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांचे मार्गदर्शन !

…भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, संवैधानिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

आर्यभट्ट यांनी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा व्यास मोजला !

गुजरातमधील समुद्राच्या किनार्‍यावरील वेरावळ येथे असलेले सोमनाथ मंदिर हे हिंदूंसाठी सर्वांत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. अनेक परकीय आक्रमणकर्त्यांनी वारंवार उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची अनेक वेळा पुनर्बांधणी केली गेली. सोमनाथ मंदिराच्या परिसरात ‘बाणस्तंभ’ नावाची एक वास्तू आहे. या स्तंभाभोवती अनेक रहस्ये आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२१.७.२०२१ पासून महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सावित्री, गांधारी अन् इतर नद्यांना महापूर येऊन पाणी महाड शहरामध्ये शिरले. त्यामुळे महाड शहरामध्ये जवळजवळ २० ते २५ फूट पाणी भरले आणि शहर दोन दिवस पाण्याखाली होते.

श्री हालसिद्धनाथ देवाची भविष्यवाणी २०२२ – अठरा तर्‍हेचा मनुष्याला एक आजार होईल…

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय ! ही भाकणूक कशा स्वरूपाची असते ? हे सर्वांना कळावे, तसेच तिचा सर्वसाधारण अर्थ काय होऊ शकतो ? तो कंसामध्ये दिला आहे.

कोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाली. सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. सत्संगांत अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांचा देहत्याग

नम्रता, निरपेक्ष प्रीती यांसारखे अनेक दैवी गुण असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असलेले, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांनी ३० ऑक्टोबर २०२२ ला दुपारी ४.२७ वाजता दीर्घ आजारामुळे देहत्याग केला.