सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून वर्ष २०२१ च्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सनातनने घरोघरी लागवड मोहीम चालू केली. या अंतर्गत साधकांना घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले. २०२२ च्या कार्तिकी एकादशीला या मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाला. या निमित्त पुण्यातील साधकांनी वर्षभरात केलेले प्रयत्न पाहू.

कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान; सनातनच्या आश्रमात झाला भावसोहळा !

अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असणारे, तसेच कर्नाटक सरकारचा ‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त करणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन

सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य आणि सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आले.

२८ व्या निवासी कीर्तन शिबिरात सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर म्हणाले, ‘‘आधुनिक विज्ञानातील संशोधनापेक्षा भारतियांनी केलेले संशोधन हे अतीप्रगत आणि परिपूर्ण आहे. पाश्चात्त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सहस्रो वर्षे आधी ऋषिमुनी आणि महर्षी यांनी अतीप्रगत आणि परिपूर्ण संशोधन केलेले आहे.

सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

भारतभरातील सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे. सात्त्विक सुगंध असलेल्या आणि सर्व ऋतुंमध्ये वापरता येईल, अशा प्रकारचे कोणत्याही आस्थापनाचे साबण चालतील.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून ‘हे खरेच ईश्वरी कार्य आहे’, असे मला वाटले. मला आश्रमात पुनःपुन्हा यायला आवडेल.’- श्री. सतीश व्यंकटराय भट, काणकोण, गोवा.

ऋषीमुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय बाळगले होते ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

श्री धन्वन्तरी देवता सर्व मानवांना आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. भारत देशाची ‘हिंदु संस्कृती’ श्रेष्ठ दर्जाची असून सारे जग आता आपले अनुकरण करत आहे. आपल्या ऋषी-मुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय त्यांच्या उराशी बाळगले होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले.

महर्षींच्या आज्ञेनुसार नवरात्रोत्सवात करण्यात आले देवींच्या कृपेसाठी होम !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे अन् सर्वत्रच्या साधकांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे, यासाठी महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात नवरात्रोत्सवाच्या काळात (२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२) देवींच्या कृपेसाठी होम करण्यात आले.

‘निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन (म.प्र.)’च्या संस्थापिका सुश्री भारती ठाकूर यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

‘सनातनचा आश्रम पाहून सनातन हिंदु धर्माच्या उज्ज्वल भविष्याविषयी खात्री वाटली. आश्रम पुष्कळ सुंदर आहे आणि येथील व्यवस्थापन उत्तम आहे’, असे मत सुश्री भारती ठाकूर यांनी व्यक्त केले.