परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

भक्तीमार्गात साधक प्रथम पूजापाठ करतो. तेव्हा कुणी म्हणते, ‘‘स्थुलातील पूजा काय करतोस ? भगवंत तर सूक्ष्म आहे ना ? पूजेऐवजी मानसपूजा कर.’’ नंतर मानसपूजेत मनाने मूर्ती ताम्हनात घेतली, मूर्तीला स्नान घातले….

‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड’कडून लक्ष्मीपूजनाचे शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण !

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड, (डी.एस्.पी.पी.एल्.), भोरपवणे’ यांच्या वतीने २४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्यामागील शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.

कुतूबमिनार नव्हे, हा तर मेरुस्तंभ, म्हणजेच आचार्य वराहमिहीर यांची अद्भुत वेधशाळा !

खरेतर अनेकदा मुसलमान कुतूबमिनारवर त्यांचा हक्क सांगतात; पण प्रत्यक्षात कुतूबमिनार कुणी बांधला ? तो नेमका काय आहे ? याविषयीच्या माहितीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

चोल राजाच्या काळात अस्तित्वात होता हिंदु धर्म आणि राजाने बांधली होती भव्य हिंदु मंदिरे !

हिंदुद्वेष्टे अभिनेते कमल हासन यांनी ‘राजा चोल यांच्या काळामध्ये हिंदु धर्म नव्हता !’, असे हास्यास्पद विधान केले. राजा चोल साम्राज्य आणि त्या काळात राजा चोल यांनी हिंदु मंदिरांसाठी केलेले कार्य यांच्याविषयी जाणून घेऊया.

साधकांनो, सध्या होणार्‍या विविध त्रासांवर मात करण्यासाठी स्वतःची साधना वाढवा !

‘सध्या अनेक साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. त्रासांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण आपत्काळ समीप आल्याचे दर्शवत आहे. ‘या आपत्काळातून तरून जाण्यासाठी स्वतःची साधना वाढवणे, हाच एकमेव पर्याय आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे. सर्वांनी दिवसभरातील अधिकाधिक वेळ सत्सेवेत रहाण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यष्टी साधनेचे, विशेषतः ‘भावजागृतीचे प्रयत्न कसे होतील ?’, याकडेही अधिक लक्ष … Read more

अध्यात्मसंपन्न जीवन जगू इच्छिणार्‍यांना कायद्याचे संरक्षण !

अध्यात्म हेही एक शास्त्र आहे. हे शास्त्र मनुष्याने चांगल्या-वाईट परिस्थितीतही शांत, स्थिर, समाधानी आणि आनंदी कसे रहायचे, हे शिकवते. सहस्रो साधक सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून त्यांच्या व्यावहारिक जीवनातील अडचणींवर मात करून सकारात्मक जीवन जगत आहेत.

साधना करून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करणे, यांसाठी मनुष्यजन्म मिळालेला असतो. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे.

८.११.२०२२ या दिवशी भारतात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित), ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

कार्तिक पौर्णिमा (८.११.२०२२, मंगळवार) या दिवशी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश आणि संपूर्ण दक्षिण अमेरिका येथे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल. त्यामुळे भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. भारताच्या पूर्वेकडील काही प्रदेशात खग्रास अवस्था दिसू शकेल; मात्र महाराष्ट्र आणि इतर प्रदेशात हे ग्रहण खंडग्रास दिसेल.

धर्मानुसार आचरण केल्याने आरोग्याचेही रक्षण होत असल्याने चंद्रग्रहणाच्या वेळी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार विनाअन्न उपवास करा !

८.११.२०२२ या दिवशी चंद्रग्रहण आहे. वेधकाळात अन्नग्रहण करणे निषिद्ध आहे. ऋषिमुनींनी ग्रहणासंबंधी एवढे कडक नियम का बरे घालून ठेवले आहेत ?, असे प्रश्न पडू शकतात. पुढे दिलेले उपवासाचे लाभ समजून घेऊन एकदा स्वतः उपवास करून ते अनुभवल्यावर मात्र आपल्याला ऋषिमुनींप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल. २४ घंटे उपवास केल्याने पुढील लाभ होतात.

अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) !

कारवार (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) यांच्याकडून सनातन संस्थेने श्री सिद्धिविनायकाची मूर्तीे घडवून घेतली. सनातन संस्थेचे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार त्यांच्याकडे शिल्पकला शिकण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना गुरुजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.