श्रेणी २ सत्संग ४ : दायित्व घेऊन सेवा करणे
आज आपण समष्टी साधना चांगली होण्यासाठी अजून एका महत्त्वपूर्ण पैलूविषयी समजून घेणार आहोत. तो पैलू आहे, दायित्व घेऊन सेवा करणे ! दायित्व म्हणजे जबाबदारी ! व्यावहारिक जीवनात जबाबदारीमुळे सहसा ताणतणाव वाढतो, तर अध्यात्मात दायित्व घेण्यामुळे शरणागती आणि देवाशी अनुसंधान वाढते. आपल्यामध्ये व्यापकत्व निर्माण होते.