घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित अनुमाने दोन सहस्रांहून अधिक ग्रंथ लवकर प्रकाशित होण्यासाठी साधकांची आवश्यकता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी ऑक्टोबर २०२२ पर्यंत ३५९ ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली आहे. अन्य अनुमाने २ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

एखाद्या प्रसंगामुळे अनावश्यक विचार वाढल्यास काय करावे ?

‘काही वेळा एखाद्या प्रसंगामुळे साधकांचे विचार अधिक वाढतात आणि बहुतेक वेळा ते अनावश्यक असतात. असे घडल्यास येथे दिल्याप्रमाणे विचार करावा किंवा प्रयत्न करावेत.

मोहाली (पंजाब) येथे अज्ञातांकडून महंतांची हत्या

मोहाली (पंजाब) येथे महंत शीतल दास (वय ७० वर्षे) यांची अज्ञातांनी धारदार शस्त्राद्वारे हत्या केली. ते येथे एका झोपडीत रहात होते. त्यांच्या हत्येमागील कारण आणि हत्या करणारे यांविषयी अद्याप कुठलीही माहिती समजू शकलेली नाही.

‘हॅलोवीन’ची विकृती साजरी करणार्‍यांचा एका धर्मप्रेमीने केलेला सडेतोड प्रतिवाद !

‘गेल्या काही वर्षांत ‘हॅलोवीन’ नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरत आहे. हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ आदींचे तोंडवळे, तसेच जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे ‘हॅपी हॅलोविन !’

विवाह निश्‍चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व

‘हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे.

अशुभ काळात जन्म झालेल्या शिशूची ‘जननशांती’ करणे का आवश्यक आहे ?

‘जनन म्हणजे जन्म होणे. नवजात (नुकत्याच जन्मलेल्या) शिशूच्या संदर्भात दोष-निवारणासाठी केल्या जाणार्‍या धार्मिक विधीला ‘जननशांती’ म्हणतात. नवजात शिशूला अशुभ काळात जन्म झाल्यामुळे किंवा विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यामुळे दोष लागतो. याविषयी अधिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.

हिंदु शब्द वैदिक आणि पौराणिक आहे ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

कर्नाटकातील काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ खूपच घाणेरडा आहे, असे म्हटले होते. त्यावर सर्वच स्तरांवरून टीका होत आहे. त्यांनी वेगवेगळा संदर्भही देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने मात्र ‘ते जारकीहोळी यांचे वैयक्तिक विधान असून पक्षाशी त्याचा काही संबंध नाही’, असे सांगत हात झटकले आहेत. 

पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांना स्पर्श !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता सूर्यकिरणे महाद्वार येथे होती, यानंतर ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे देवीच्या चरणांना स्पर्श करून डाव्याबाजूने लुप्त झाली.

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांचे निधन

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मामेभाऊ तथा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील विजय (नाना) वर्तक यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता नागोठणे येथील त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

कृष्णभक्त संत मीराबाई

ईश्वर निर्गुण-निराकार आणि सगुण-साकारही आहे. निराकार चेतन रूपात सृष्टीत भरलेला आहे. त्याच्याविना कुठेही काही नाही. वस्त्रात सूत असते आणि लाटेत पाणी असते, तसा तो सर्वत्र आहे. त्याच्याविना जगात कुठली सत्ता नाही. या गोष्टी ऐकून विश्वास ठेवावा लागतो. श्रद्धा आणि विश्वास यांच्याविना काही हाताला लागत नाही.