वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील देव दीपावलीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सन्मान

देव दीपावलीचा कार्यक्रम सूरजकुंड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांचा पुष्पहार अन् स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

साधकांनो, आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेत सतत पालट होत असल्याने वेळोवेळी त्रासाची लक्षणे अभ्यासून ‘किती घंटे उपाय करावेत ?’, याविषयी उत्तरदायी साधकांना विचारा !

साधक प्रतिदिन नामजपादी उपाय करतात. साधकांनी स्वतःला होणा-या त्रासाच्या लक्षणांचा, उदा. न सुचणे, डोके जड होणे, अनावश्यक विचार करणे, याचा साधकांनी वेळोवेळी अभ्यास करायला हवा. यासंदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

मंगळदोष – समज आणि गैरसमज

विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्यांतील मंगळदोषाचा विचार केला जातो. अनेकदा व्यक्तीचा विवाह केवळ ‘मंगळदोष आहे’ म्हणून सहजतेने जुळून येत नाही. मंगळदोषाविषयी समाजात अपसमज असल्याचे दिसून येते, तथापि आता त्याचे प्रमाण कमी होत आहे. मंगळदोषासंबंधी समज आणि गैरसमज या लेखाद्वारे समजून घेऊया.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार या छायाचित्रात इतरांपेक्षा पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सेवेनिमित्त पू. ताईचा सहवास मिळत असतो. पू. ताईच्या सहवासात असतांना मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. ताईच्या चैतन्याने त्रास पुष्कळ लवकर उणावत असल्याचे बर्‍याचदा अनुभवायला मिळते.

प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी (पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमी, म्हणजेच १८ नोव्हेंबर या दिवशी कांदळी, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

प्रतापगडावरील अतिक्रमणाविरोधात लढा देणारे प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांचे प्रतापगड कारवाई आणि सनातन संस्थेविषयी अभिप्राय

सनातन संस्थेने हिंदु समाजात गुणात्मक परिवर्तन केले आहे. सनातनच्या कार्याविषयी मला आदर आहे. सनातनच्या साधकांत धर्मनिष्ठा आहे. सनातनमुळे हिंदु समाजाचा दृष्टीकोन पालटला…. – श्री. मिलिंद एकबोटे

वैश्विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच

‘वर्ष २०२० च्या जुलै मासाच्या आरंभी आमच्या रहात्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर एका भागात रहाणार्‍या व्यक्तीचे ती ‘कोरोना पॉझिटीव्ह’ असल्याचे निदान झाले. त्यामुळे आम्ही रहात असलेली इमारत सील करण्यात आली. त्यामुळे मला माझ्या दोन लहान मुलींना (मोठीचे वय ४ वर्षे आणि धाकटीचे वय ३ वर्षे) घेऊन माझ्या सासरी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्त्वाचे त्यांच्या निकटवर्तियांनी, काही मान्यवरांनी आणि सनातनचे प्रवक्ता यांनी उलगडलेले पैलू

बाबासाहेब यांचे कर्तृत्व वादातीत होते. त्यांनी ‘शिवचरित्र’ ग्रंथाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगासमोर मांडला. त्यांनी ‘जाणता राजा’ या महानाट्याची निर्मिती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोचवला.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट

मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, तसेच स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर आणि संशोधक श्री. धनंजय शिंदे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

कलाकृती बनवण्यासाठी ‘कोरल ड्रॉ’ आणि ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालींचे ज्ञान असलेल्या साधकांची तातडीने आवश्यकता आहे.