देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तपालखीचे आगमन !

प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले.

धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी गाठली ६४ टक्के, तर भगवंताविषयी अपार भक्ती असलेले सनदी लेखापाल श्री. सतीशचंद्र यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरुदेवांविषयी अपार श्रद्धा आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी ६४ टक्के तसेच नम्रता अन् भगवंताविषयी अपार भक्ती असलेले मंगळुरू येथील सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) श्री. सतीशचंद्र यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी भावपूर्ण वातावरणात घोषित केले.

दत्त जयंती २०२२ निमित्त सनातन संस्थेचे ठिकठिकाणी ग्रंथ-उत्पादन प्रदर्शन !

दत्त जयंती २०२२ निमित्त सनातन संस्थेने ठिकठिकाणी ग्रंथ-उत्पादन प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनांना मान्यवर आणि जिझासू यांनी भेट देऊन चांगला प्रतिसाद दिला.

श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग) येथील दत्तमंदिरात वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीपूर्वी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते झालेले सनातनच्या प्रदर्शन कक्षांचे उद्घाटन !

व्यष्टी साधना चांगली झाल्यावर समष्टी सेवाही चांगली होते आणि आनंद मिळतो. गुरूंचे मन जिंकण्याची गोष्ट म्हणजे सेवा ! प्रत्येक सेवा परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांजवळ जाण्यासाठीच असून सेवा परिपूर्ण केल्यास ती ईश्वरचरणी रुजू होते. त्यामुळे साधकांनी परिपूर्ण सेवा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

भोर येथील ‘सुभाष इंजिनीयरिंग वर्क्स’ या आस्थापनात ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आनंद शोधत असतो, तो मिळवून आनंदी जीवन जगायचे असेल, तर प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. शशांक मुळे यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

सनातनच्या आश्रमात नामचिंतन केले जात असल्याने ही भूमी पवित्र झाली आहे ! – ह.भ.प. गणेश महाराज

सनातनच्या आश्रमात नामचिंतन केले जात असल्याने ही भूमी पवित्र झाली आहे. गायीच्या शेणाने भूमी सारवल्यासही ती पवित्र होते. दुसर्‍याकडे असणारे सद्गुण आपण आत्मसात् करावेत. धर्माची वृद्धी आणि धर्माचे संरक्षण करणे, हे सनातनचे कार्य चांगले आहे, असे मार्गदर्शन येथील ह.भ.प. गणेश महाराज यांनी केले.

हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधकांचे रक्षण यांसाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दैवी प्रवासात करत असलेले अपार परिश्रम !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची दैवी प्रवासाच्या माध्यमातून एक तपश्चर्याच पूर्ण झाली आहे. या निमित्ताने या सेवेच्या माध्यमातून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ किती कठोर परिश्रम करत आहेत, हे उलगडण्याचा प्रयत्न करत आहे.

तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत

भारतीय कालमापन पद्धतीत ‘तिथी’ला महत्त्व आहे; परंतु सध्याच्या ‘ग्रेगोरीयन’ (युरोपीय) कालगणनेमुळे भारतात तिथीचा उपयोग व्यवहारात न होता केवळ धार्मिक कार्यांसाठी होतो. प्रस्तुत लेखाद्वारे तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत समजून घेऊया.

देवघरातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या छायाचित्रात झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

माझ्या घरातील देवघरात असणा-या ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या छायाचित्रात ७ – ८ मासांपासून पुढील पालट जाणवत आहेत. दत्तात्रेयांच्या आधीच्या छायाचित्रात पार्श्वभूमीचा रंग गडद निळा होता. आता तो रंग फिकट होऊन पांढ-या रंगाचे प्रमाण वाढले आहे.