RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे संघाच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीसाठी गोव्यात आगमन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) 2 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान गोव्यात राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी आज (दि.02) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) गोव्यात दाखल झाले आहेत.

‘ज्ञानम्’ महोत्सवात हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’चे प्रकाशन !

धर्मजागृतीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सनातन पंचांगा’च्या हिंदी भाषेतील आवृत्तीचे, तसेच हिंदी आवृत्तीच्या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’ आणि ‘अ‍ॅपल अ‍ॅप’चे प्रकाशन जयपूर येथे आयोजित सुप्रसिद्ध ‘ज्ञानम्’ महोत्सवात करण्यात आले.

ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण करण्याचे महत्त्व

भारतात रत्नांचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. प्राचीन ऋषी, ज्योतिषी, वैद्याचार्य आदींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये ‘रत्नांचे गुणधर्म आणि उपयोग’ यासंबंधी विवेचन केले आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहदोषांच्या निवारणासाठी रत्नांचा उपयोग केला जातो. रत्ने धारण करण्यामागील उद्देश आणि त्यांचा उपयोग या लेखाद्वारे समजून घेऊया.

भोसरी (जिल्हा पुणे) येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनास जिज्ञासूंच्या भेटी !

भोसरी (पुणे) येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’च्या द्वितीय दिवशी महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सनातनच्या  ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनास जिज्ञासूंनी भेटी दिल्या.

लव्ह जिहादसह हिंदु धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

गेल्या काही वर्षांपासून अनेक हिंदु तरुणी देशभरात लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. लव्ह जिहादचे नियोजनबद्ध षड्यंत्र पहाता आणखी हिंदु युवती याला बळी पडतील. ‘लव्ह जिहाद’सह विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.

शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हणजे आध्यात्मिक जीवनाला गती देणारी पर्वणी !

शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हटली की सामान्यतः आपल्याला भीती वाटते. ‘माझा वाईट काळ चालू होणार, संकटांची मालिका चालू होणार’, इत्यादी विचार मनात येतात; परंतु साडेसाती सर्वथा अनिष्ट नसते. या लेखाद्वारे ‘साडेसाती म्हणजे काय आणि साडेसाती असतांना आपल्याला काय लाभ होऊ शकतात’, याविषयी जाणून घेऊया.

पेण येथील चामुंडा ज्वेलर्स आणि भारतीय ॲल्युमिनियम यांच्या मालकांची सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

पेण येथील ‘चामुंडा ज्वेलर्स’चे मालक श्री. वरदी सिंह परमार आणि ‘भारतीय ॲल्युमिनियम’चे मालक श्री. अमर सिंह परमार यांनी नुकतीच देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. ते दोघेही हिंदुत्वनिष्ठ असून राष्ट्र-धर्म कार्यात वेळोवेळी सहभागी होतात.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

निधर्मीवादाच्या विळख्यात अडकलेल्या बहुसंख्य हिंदूंना लव्ह जिहाद, हलाल जिहाद, भूमी जिहाद अशा निरनिराळ्या जिहादी प्रकरणांना प्रतिदिन बळी पडावे लागत आहे, तर अखंड सावधान राहून सर्वांनी एकत्रित येऊन हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा.

नवी मुंबई येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कामोठे येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सनातनच्या वतीने हावडा (बंगाल) येथे दत्त जयंतीनिमित्त आयोजित प्रवचनाला चांगला प्रतिसाद !

दत्त जयंतीनिमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील आनंदमयी आश्रम मंदिरामध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. तनुश्री साहा यांनी दत्तजयंतीचे महत्त्व, दत्त नावाची वैशिष्ट्ये, भगवान दत्तात्रयाच्या जन्माचे रहस्य, दत्त उपासनेचे शास्त्र आदी सूत्रांविषयी माहिती दिली.