देवतेच्‍या यंत्रामध्‍ये त्रासदायक स्‍पंदने आली असल्‍यास त्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करा !

नकारात्‍मक स्‍पंदने असलेल्‍या देवतेच्‍या यंत्रावर रिकाम्‍या खोक्‍यांचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करावेत. रिकाम्‍या खोक्‍यातील पोकळीमध्‍ये त्रासदायक शक्‍ती खेचली गेल्‍याने आध्‍यात्मिक लाभ होतात.

वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या लागवडीसाठी सुटसुटीत (पोर्टेबल) मांडव

आपण वेलवर्गीय भाज्‍या किंवा फुले लावतो, तेव्‍हा त्‍या वेलींना वर चढण्‍यासाठी आधार देण्‍याची आवश्‍यकता असते. हा आधार मांडवाद्वारे कशा प्रकारे आणि घरातील कोणते साहित्‍य घेऊन द्यायचा ? म्‍हणजे वेलवर्गीय भाज्‍यांची लागवड आणि त्‍या मिळवणे सोपे होईल अन् त्‍यासाठी ‘सुटसुटीत मांडव स्‍वतःच कसा बनवायचा’, हे या लेखाद्वारे पाहू.

भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्‍थेचे संस्‍थापक विश्‍वनाथ बिवलकर यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला भेट !

देवद (पनवेल) येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाला मुलुंड (पू.) येथील भाजपचे माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी, तसेच कला, क्रीडा आणि मुलाखत यांसाठी मुलांना मार्गदर्शन करणार्‍या ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्‍थेचे संस्‍थापक अन् कोलशेत (ठाणे) येथील श्री. विश्‍वनाथ बिवलकर यांनी भेट दिली

‘श्रीगीता पठण आभासी (ऑनलाईन) अंतिम स्‍पर्धे’त नागपूर येथे सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक !

श्रीचिन्‍मय मिशनच्‍या वतीने ‘श्रीगीता पठण आभासी अंतिम स्‍पर्धा ’ डिसेंबर २०२२ मध्‍ये आयोजित करण्‍यात आली होती. त्‍या स्‍पर्धेत सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक म्‍हणून एक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि स्‍वामी विवेकानंदांविषयीचे पुस्‍तक मिळाले.

नैसर्गिक कालविभाग : वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष

सूर्य आणि चंद्र हे कालपुरुषाचे नेत्र समजले जातात. सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणांमुळे आपल्याला काळ मोजता येतो अन् त्याचा व्यवहारात उपयोगही करता येतो. ‘वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष’ या नैसर्गिक कालविभागांची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.

‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्‍या पुणे येथील जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !

वर्ष २०१९ च्या शेवटी आलेल्या कोरोना महामारीच्या कालावधीत जगभरात दळणवळण बंदी लागू झाली. अनेक ठिकाणी कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होऊन जीवन तणावपूर्ण झाले होते. ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात कन्‍नड भाषेतील साधना शिबिर पार पडले !

या शिबिरात ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कार्याचा परिचय’ हा विषय श्री. मोहन गौडा आणि श्री. शरद कुमार यांनी मांडला. ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ हा विषय सौ. मंजुळा गौडा आणि श्री. अरुण कुलकर्णी यांनी, तर ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व’ हा विषय सौ. मंजुळा गौडा अन् कु. रेवती मोगेर यांनी मांडला.

‘हैद्राबाद बुक फेअर’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे प्रतिवर्षीप्रमाणे २२ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत ३५ वे ‘हैद्राबाद बुक फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नवग्रहांची उपासना करण्यामागील उद्देश आणि त्यांचे महत्त्व !

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोषांच्या निवारणासाठी ग्रहदेवतांची उपासना करण्यास सांगितले जाते. या उपासना करण्यामागील उद्देश आणि त्यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सनातन संस्थेचे मोठे योगदान असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सनातन संस्था करत असलेले कार्य हे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील पुष्कळ मोठे योगदान असेल. प्रत्येकामध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि प्रत्येकाचे जीवन संस्कारमय व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांचा प्रयत्न असतो. सनातन संस्था आणि संस्थेचे साधक निःस्वार्थीपणे कार्य करतात, असे गौरवोद्गार गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.