गुजरात येथील ‘कर्णावती समन्वय परिवार गुजरात’ या संस्थेकडून उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सनातन संस्थेचा सन्मान !

उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी सनातन संस्थेचा सन्मान भाजपशासित गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेचे गुजरात येथील साधक श्री. चंद्रशेखर कद्रेकर यांचा शाल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

पितृपक्ष निमित्त कोची (केरळ) येथील दत्त मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !

ध्या चालू असलेल्या पितृपक्ष निमित्त १८ सप्टेंबर या दिवशी आलुवा येथील श्री दत्त आंजनेय मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले.

गणेशोत्‍सव निमित्त ‘ओम प्रमाणपत्र’ वितरण चळवळीस सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद !

‘ओम प्रमाणपत्र’ ही एक चळवळ ही हिंदूसंघटनासाठी, तसेच हिंदूंच्‍या अस्‍तित्‍वासाठी राबवण्‍यात आलेली चळवळ आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली चालू झालेल्‍या या चळवळीसाठी ‘ओम प्रतिष्‍ठान’ची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून झाला प्रसार !

कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सव निमित्त प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी येथील ‘एफ् १२५ सेक्टर १०’ येथे जिज्ञासू मीनू शर्मा यांच्या घरी ‘श्री गणेशोत्सवाचे शास्त्र’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

गुरुग्राम (हरियाणा) येथे गणेशोत्सव निमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा चांगला प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाचे तत्त्व १ सहस्र पटींनी अधिक असते. या तत्त्वाचा लाभ गणेशभक्तांना अधिकाधिक व्हावा आणि त्यांना श्री गणेशाच्या उपासनेसह विविध आध्यात्मिक..

श्रेणी २ सत्संग ६ : स्वभावदोष निवडणे आणि त्याची व्याप्ती काढणे

गेल्या आठवड्यात आपण स्वयंसूचना बनवतांना काय काळजी घ्यायची ?, हे समजून घेतले. आजच्या सत्संगामध्ये आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी स्वभावदोष कसे निवडायचे ? आणि त्यांची व्याप्ती कशी काढायची ?, हे समजून घेणार आहोत.

श्रेणी २ सत्संग ५ : स्वयंसूचना बनवतांना घ्यायची काळजी

आजच्या सत्संगात आपण स्वयंसूचना बनवतांना काय काळजी घ्यायची ?, हे समजून घेणार आहोत. स्वयंसूचना योग्य पद्धतीने बनवल्या गेल्या, तर त्या अधिक परिणामकारक होतात. स्वयंसूचना बनवतांना ती प्रभावी होण्यासाठी आणि मनाकडून लवकर स्वीकारली जाण्यासाठी काय सूत्रे लक्षात घ्यायला हवीत, याविषयी पाहूया.

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संत अनगोळ (बेळगाव) येथील पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

माझा अध्यात्माकडे ओढा असल्याने विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता यावा, यासाठी मी परीक्षा दिल्या आणि त्यांत मी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.