गोव्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिदिन १ घंटा नामजप करून समष्टी स्तरावर आपले योगदान द्या !
उष्णतेची लाट येणे’ या आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना केली पाहिजे ?’, याची सूचना गोवा शासनाने जाहीर केली आहे. त्याचे पालन लोकांनी करायचेच आहे. या आधिदैविक आपत्तीवर नुसती शारीरिक किंवा मानसिक स्तरावर उपाययोजना करून उपयोगाची नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही उपाययोजना केली पाहिजे.