शीख परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

शीख पंथीय गुरु गोविंदसिंग यांच्या परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांनी १६ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनुयायी श्री. कुलदीप सिंग आणि त्यांची पत्नी सौ. किरण सिंग आदीही होते.

सनातनच्या साधिका सौ. अपर्णा जोशी ‘प्राज्ञ’ पुरस्काराने सन्मानित !

हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या परीक्षार्थीना यंदा एकनाथषष्ठीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ मार्च या दिवशी ‘प्राज्ञ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

पोटदुखी आणि पाणी

पाणी आणि पोट यांचा संबंध घनिष्ठ असल्याने पाणी पिण्याच्या पद्धतींचा थेट परिणाम आपल्या पोटासंबंधित गोष्टींवर पडतो, यासाठीच पुढील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

गुढीपाडवा २०२३ निमित्त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा ! ‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया ! त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी अवतारी कार्य करतांना पितृआज्ञेने … Read more

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ पार पडले !

सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते. ‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता.

पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसन्मान सोहळ्यातील भावमोती !

फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्‍या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांच्या रूपाने सनातनच्‍या समष्‍टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले.

कोपरखैरणे येथील सनातनच्‍या साधिका सौ. तनुजा यादव यांचा महिला दिन निमित्त गौरव !

या वेळी सौ. तनुजा यादव यांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मानचिन्‍ह देऊन सन्‍मान करण्‍यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीमती सुजाता ढोले यांच्‍या हस्‍ते या कार्यक्रमाचे उद़्‍घाटन झाले.

‘सनातन संस्थे’चे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला दिनकर कसरेकर (वय ८६ वर्षे) यांचा खडतर साधनाप्रवास !

कै. जीजी यांचे बालपण, दिनकरशी झालेला त्यांचा विवाह, त्यांचे खडतर जीवन, त्यांचा स्वभाव, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या अत्युच्च कोटीच्या संतांशी संसार करतांना अत्यंत धैर्याने त्यांनी केलेला संसार आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील विद्यार्थांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच महिलांसाठी प्रथमोपचार उपक्रमाचे यशस्वी आयोजन !

सनातन संस्थेच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. पुणे येथील इ. ८ वी च्या विद्यार्थांसाठी 11 मार्च या दिवशी आरोग्य विषयक मार्गदर्शन हा उपक्रम घेण्यात आला.

गुरूंवरील दृढ श्रद्धा, भाव, उत्तम नेतृत्‍वगुण आणि प्रेमभाव या गुणांचा समुच्‍चय असणार्‍या पुणे येथील सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या १२३ व्‍या समष्‍टी संतपदी विराजमान !

सौ. मनीषा पाठक या अनेक शारीरिक त्रास असतांनाही अत्‍यंत तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करतात. सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिल्‍यानंतर सर्व साधक भावस्‍थितीत डुंबून गेले.