२० एप्रिलला होणारे सूर्य-ग्रहण भारतात दिसणार नाही !

या वर्षीचे २० एप्रिल या दिवशी पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळही मानण्याची आवश्यकता नसणार आहे.

पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांची गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

मु.पो. राख, तालुका पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके आणि त्यांची पत्नी सौ. संजना मांडके यांनी ५ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात.

नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. ७ ते १० एप्रिल या कालावधीमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत वाशी रेल्वे स्थानकासमोरील ‘सिडको एक्झिबिशन सेंटर’मध्ये हे २१ वे ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’ आयोजित करण्यात आले.

हनुमान जयंती निमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये फलक प्रसिद्धी, सामूहिक नामजप आणि मारुति स्तोत्र पठण, प्रवचन तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरात ग्रंथ, सात्त्विक उत्पादनांचे कक्ष, फ्लेक्स प्रदर्शन लावणे, असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

सनातन संस्था आयोजित ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान पार पडले !

हिंदूंना रामनामाची शक्ती आणि आशीर्वाद मिळावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान आयोजित करण्यात आले होते. या संकीर्तनाचा उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांतील अनेक रामभक्तांनी लाभ घेतला.

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

गुढीपाडव्‍यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत

गोवा दूरदर्शनवर गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत घेण्‍यात आली. या मुलाखतीत सौ. गरुड यांनी गुढीपाडव्‍याविषयी सविस्‍तर माहिती दिली.

हनुमान जयंती निमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

कलियुगात अवतरलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) अवतारत्वाची अनुभूती घेत रहाणे’, हीच ‘गुरुभक्ती’ आहे, तर त्यांच्या अवतारी चरित्राचे कीर्तन करणे, म्हणजेच ‘गुरुसेवा’ आहे.

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. गुढीपाडव्याविषयी माहिती देणार्‍या हस्तपत्रकाचे वितरण करण्यात आले. मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली.

‘गोबेल्स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्ट्रभक्तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.