गुरुपालट (गुरु ग्रहाचा मेष राशीत प्रवेश)
शुक्रवार, २१.४.२०२३ या दिवशी, म्हणजे वैशाख शुक्ल प्रतिपदा या तिथीला उत्तररात्री २९.१५ वाजता, म्हणजे २२ एप्रिल शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु या ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते.