सनातन संस्था आयोजित ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान पार पडले !

हिंदूंना रामनामाची शक्ती आणि आशीर्वाद मिळावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान आयोजित करण्यात आले होते. या संकीर्तनाचा उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांतील अनेक रामभक्तांनी लाभ घेतला.

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

गुढीपाडव्‍यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत

गोवा दूरदर्शनवर गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत घेण्‍यात आली. या मुलाखतीत सौ. गरुड यांनी गुढीपाडव्‍याविषयी सविस्‍तर माहिती दिली.

हनुमान जयंती निमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

कलियुगात अवतरलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) अवतारत्वाची अनुभूती घेत रहाणे’, हीच ‘गुरुभक्ती’ आहे, तर त्यांच्या अवतारी चरित्राचे कीर्तन करणे, म्हणजेच ‘गुरुसेवा’ आहे.

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. गुढीपाडव्याविषयी माहिती देणार्‍या हस्तपत्रकाचे वितरण करण्यात आले. मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली.

‘गोबेल्स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्ट्रभक्तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महाराष्ट्रातील भक्तांचे ८ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी त्यांनी आश्रमातील अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले.

सर्व कक्षांमध्ये सनातनचा कक्ष वैशिष्ट्यपूर्ण ! – सौ. शुभांगी बिरमुळे, सरपंच, रेठरेहरणाक्ष

महिला दिन निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी २६ वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष लावण्यात आले होते. येथे सनातन संस्थेने एक कक्ष सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा लावला होता.

धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी जन्माष्टमी महोत्सव निमित्त सनातन संस्थेच्या साधकांनी त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले ! !

आपण देव, देश आणि धर्म यांसाठी केलेल्या कार्यानेच सद्गुरु संतुष्ट होतात. आपल्या मुलांना शिक्षण देण्याबरोबर देव, देश आणि धर्म यांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली पुढची पिढी राष्ट्रभिमानी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

चालू वर्षीच तिसरे महायुद्ध होईल ! – भविष्यवेत्ते क्रेग हैमिल्टन पार्कर

तिसरे महायुद्ध हे रशिया-युक्रेन नव्हे, तर तैवानमुळे होईल. तैवानमध्ये एक भयानक विमान दुर्घटना होईल आणि तेच तिसर्‍या महायुद्धाचे कारण बनेल. या युद्धाचे परिणाम गंभीर असतील. चीन अनेक भागांमध्ये विखुरला जाईल.