ढवळी (गोवा) येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित बिंदुदाबन शिबिर !

सनातनच्या साधकांसाठी तीन दिवसीय बिंदुदाबन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गाेचपारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. या प्रसंगी काही रुग्ण साधकही शिबिरात सहभागी झाले होते.

फरीदाबाद (हरियाणा) येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रे’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा संकल्प !

फरीदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मस्थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्यांचे नाव देऊन नागोठणे ग्रामस्थांकडून त्यांच्या धर्मकार्याचा गौरव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा येथे जन्म झाला, ही आम्हा नागोठणेवासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे. येथील मार्गाला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ यांचे नाव देण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये आला, तेव्हा सर्व ग्रामस्थांनी त्याला एकमताने मान्यता दिली.

भाव-भक्तीचा वर्षाव करणारा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव फर्मागुडी (गोवा) येथे साजरा !

भावमय, भक्तीमय आणि विष्णुमय वातावरणात सप्तर्षींच्या आज्ञेने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव’ साजरा करण्यात आला. गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात साधकांनी श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांसाठी जणू भूवैकुंठ उभारले !

भाग्‍यनगर (आंध्रप्रदेश) येथे आयोजित भव्‍य ‘सनातन एकता शोभायात्रे’त हिंदुत्‍वनिष्‍ठांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्या जन्‍मोत्‍सव निमित्त… भाग्‍यनगर – सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने येथे भव्‍य ‘सनातन एकता शोभायात्रा’ काढण्‍यात आली. महाराष्‍ट्र मंडळाच्‍या ढोलपथकाच्‍या वाद्यगजरात निघालेल्‍या या शोभायात्रेला धर्मप्रेमींचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी सनातन एकता मंच, बजरंग सेना, हिंदू संघटन एकता मंच, सनातन हिंदू संघ, हिंदू टू हिंदू, … Read more

जिवंतपणा जाणवणारे आणि चैतन्याची अनुभूती देणारे नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान !

जन्मस्थानाच्या वास्तूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अत्यंत भावपूर्ण वंदन केले. संपूर्ण वास्तू आणि वास्तूच्या आजूबाजूचा परिसर पहातांना त्याविषयी त्या अतिशय जिज्ञासेने अन् बारकाईने जाणून घेत होत्या.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हंपी (कर्नाटक) येथील माल्यवंत पर्वताच्या स्थानी असलेल्या ‘श्री रघुनाथ मंदिरा’चे घेतलेले दर्शन !

हे भव्य मंदिर पहातांना ‘त्या काळी एका पर्वतावर एवढे मोठे दगड नेऊन मंदिर कसे बांधले असेल ?’, याची कल्पनाही करवत नाही. खरेच, आपले महान पूर्वज, दैवी आणि धर्मशास्त्रसंपन्न शिल्पकार अन् त्यांना राजाश्रय देणारे राजे यांना आमचा कोटीशः प्रणाम !

साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कसे घडवले, याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भावपूर्ण मनोगत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त बिहार आणि उत्तरप्रदेश येथील विविध मंदिरांमध्ये प्रार्थना

सैदपूर येथील जुन्या महादेव मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करून आशीर्वाद घेत असतांना १०० हून अधिक भाविक उपस्थित होते.

हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवतांना साकडे !

हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी देवतांच्या चरणी साकडे घालण्यात आले, तसेच काही ठिकाणी मंदिर स्वच्छता करून साकडे घालण्यात आले.