‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ निमित्त (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. जयंत आठवले यांचा संदेश

आपणा सर्व हिंदु राष्ट्रविरांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी भक्ती करण्याची बुद्धी आणि देवतांची शक्ती मिळावी, यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

पुणे येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

उपाशीपोटी रुग्‍णांची तपासणी कशी करावी ?, बिंदूदाबनाची तात्त्विक माहिती, हात-पाय यांवरील प्रत्‍येक बिंदूचे कार्य, मणक्‍याचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा न्‍यून करावा ? या विषयावर डॉ. जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

सातारा येथे गुरुपौर्णिमा विशेष स्‍मरणिकेचे पू. योगेशबुवा रामदासी यांच्‍या हस्‍ते प्रकाशन !

या वेळी सनातनच्‍या कार्याला आशीर्वाद देताना समर्थभक्‍त पू. योगेशबुवा रामदासी म्‍हणाले की, राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे सनातन संस्‍थेचे कार्य मोठे आहे. हिंदूंमध्‍ये स्‍वधर्म, स्‍वभाषा, स्‍वराष्‍ट्राभिमान रुजवण्‍याचे कार्य सनातन संस्‍था करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त हुब्बळ्ळी आणि मंगळुरू (कर्नाटक) येथे हिंदू एकता दिंडी !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हुब्बळ्ळी आणि मंगळुरू येथे हिंदू एकता दिंडीचा उपक्रम घेण्यात आला.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरेल.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सव निमित्त करवीरनगरीत ३ सहस्र हिंदूंचा हिंदु ऐक्‍याचा जागर !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सव निमित्त नगर येथे हिंदु एकता दिंडी !

दिंडीत ठिकठिकाणी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवून समाजातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडी मार्गातील व्‍यावसायिक धर्मप्रेमी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्‍वागत करत होते. व्‍यापार्‍यांनी दिंडीतील सर्वांना पाणीवाटप केले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सव निमित्त पुणे येथील भव्‍य हिंदु एकता दिंडीत १२ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींकडून हिंदु राष्‍ट्राचा जागर !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान राबवले जात आहे. त्‍या अंतर्गत २८ मे या दिवशी हिंदु राष्‍ट्राचा जागर करण्‍यासाठी येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते.

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सव निमित्त सातारा येथील ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदु राष्‍ट्राचा जयघोष !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियानाच्‍या अंतर्गत सातारा येथे २८ मे या दिवशी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते. या दिंडीत शहरातील समस्‍त हिंदु बांधवांनी शेकडोंच्‍या संख्‍येने सहभागी होत हिंदु राष्‍ट्राचा जयघोष केला.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सव निमित्त सोलापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’त घडले हिंदूसंघटनाचे दर्शन !

या दिंडीमध्‍ये १० सहस्रांहून अधिक हिंदूंच्‍या सहभागाने सोलापुरात हिंदु तेजाचा आविष्‍कार पहायला मिळाला. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे राष्‍ट्रगुरु आणि मोक्षगुरु आहेत. त्‍यांच्‍या स्‍मरणात, ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या जयघोषात, चैतन्‍याने भारलेल्‍या वातावरणात आणि साधकांच्‍या अपूर्व उत्‍साहात काढण्‍यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्‍याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्‍कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली !