सनातनच्‍या ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘इ-बुक’चे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते लोकार्पण !

या इ-बुकमध्‍ये ‘अध्‍यात्‍मशास्‍त्रातील मूलभूत तत्त्वांनुसार आणि शीघ्र गुरुकृपा संपादन करता येईल अशी सोपी अन् योग्‍य साधना कोणती करावी ?’, याचे प्रायोगिक मार्गदर्शन केले आहे. हे इ-बुक ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर उपलब्‍ध आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कौंडण्‍यपूर (अमरावती) येथे हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी केली प्रार्थना !

या वेळी तेथील भक्‍त आणि राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. विजय डहाके यांनी मंदिराचा इतिहास आणि आध्‍यात्मिक महत्त्व यांविषयी माहिती दिली,

ठाणे आणि नवीन पनवेल येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

शिबिरात आलेल्‍या रुग्‍णांवर गुडघेदुखी, मणक्‍याचे त्रास, फ्रोजन शोल्‍डर या त्रासांवर उपचार करण्‍यात आले. उपचारानंतर त्‍यांचा त्रास उणावल्‍याचे रुग्‍णांच्‍या लक्षात आले.

सनातन संस्था शिकवत असलेले स्वभावदोष निर्मूलन शिकून कृतीत आणा ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात.त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेत कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक संत, सनातन संस्था

आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो.

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतरही अनेक ठिकाणी हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चाद्वारे हिंदूंनी याविरोधात रोष व्यक्त करूनही अशा घटना थांबवण्यास सिद्ध नाहीत. धर्माचरण आणि साधना हेच समस्येसाठी मूळ उत्तर असल्याने ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्‍या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्‍न झाले.’