पुणे येथे ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’च्‍या ‘स्‍वयंभू’ दिवाळी अंकाचे सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या हस्‍ते प्रकाशन !

सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या शुभहस्‍ते स्‍वयंभू दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्‍यात आले. या सोहळ्‍याला १२५ हून अधिक जणांची उपस्‍थिती होती. प्रारंभी सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्‍या शुभहस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले.

‘गूगल’ने ऐन दिवाळीत ‘प्ले स्टोअर’वरून सनातन संस्थेचे ५ अ‍ॅप्स हटवले !

सनातन संस्थेचा कोणत्याच गुन्ह्यात सहभाग नसल्याचे भारतीय न्यायालयांच्या निकालांतून वेळोवेळी स्पष्ट झालेले असतांना गूगल असे कोणत्या आधारावर म्हणत आहे ? हे त्याने स्पष्ट केले पाहिजे !

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट दिली.

कर्णावती (गुजरात) येथील सनातनचे १२७ वे (व्‍यष्‍टी) संत पू. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) यांची त्‍यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) सनातनच्‍या १२७ व्‍या (व्‍यष्‍टी) संतपदी विराजमान झाल्‍याची घोषणा करण्‍यात आली. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी त्‍यांचा सन्‍मान केला.

आश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या दिवशी असलेले खंडग्रास चंद्रग्रहण, ग्रहणात करावयाची कर्मे आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल !

हे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंड या प्रदेशांत दिसेल.

सनातन धर्म नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍यांच्‍या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्‍छेद हेच ध्‍येय ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

महाराष्‍ट्रातील सनातनधर्मीय हिंदु समाजाने सजग होण्‍याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करण्‍याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

एर्नाकुलम् (केरळ) येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

‘अध्‍यात्‍माची आवश्‍यकता, मंदिरात दर्शन घेण्‍याची योग्‍य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्‍याख्‍यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्‍या अनेक सदस्‍यांनी घेतला.

सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

सनातन संस्थेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दौडीचे स्वागत सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीता दामले आणि सौ. प्रतिक्षा जोशी यांनी केले.

प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट

भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

कराड येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे भव्य प्रदर्शन !

सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा भव्य प्रदर्शन कक्ष येथील श्री दैत्यनिवारणी मंदिरात उभारण्यात आला आहे.