सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा गुढीपाडव्यानिमित्त संदेश

राष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी आधी जनतेला स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्यासाठी सलग काही वर्षे प्रयत्न करावे लागतील. व्यक्तीगत जीवनात रामराज्य आणण्यासाठी स्वतः साधना करावी लागेल, तसेच नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

‘सूक्ष्म दृष्टीने संचरण करून आपल्या आतील चेतना कशी जागृत करावी ?’, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.’…..

देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.

‘कोल इंडिया लिमिटेड’ आस्थापनाचे तंत्रनिर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) जितेंद्र मलिक यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

आश्रमातील सर्व साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहितात’, हे पाहून श्री. मलिक यांना त्याचे पुष्कळ कौतुक वाटले. या वेळी श्री. मलिक यांनी त्यांच्या आस्थापनाच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने १३६ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्यांना सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.

साधकांनो, आपोआप होत असलेला नामजप न करता आध्‍यात्‍मिक त्रास न्‍यून होण्‍यासाठी उपाय म्‍हणून सांगितलेला नामजप करा !

‘काही वेळा साधकांचा आध्‍यात्‍मिक त्रास न्‍यून होण्‍यासाठी उपाय म्‍हणून संत किंवा उत्तरदायी साधक त्‍यांना विशिष्‍ट नामजप करण्‍यास सांगतात, त्यावेळी ‘आमच्‍याकडून उपायांसाठी सांगितलेला नामजप होत नाही….

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांची घेतली सदिच्छा भेट !

भाजपचे सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. विलास मडिगेरी यांचा सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग असतो. संस्थेच्या कार्याचे ते नेहमीच कौतुक करतात.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ; सनातन संस्था सहभागी !

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’ नावाची आध्यात्मिक संस्था ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन करत आहे. हा महोत्सव १४ ते १७ मार्च या ४ दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ‘कान्हा शांति वनम्’ नावाच्या ध्यानधारणेसाठीच्या जगातील सर्वांत मोठ्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात सनातन संस्था सहभागी होणार आहे.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

ज्ञानयोगी पू. अनंत बाळाजी आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या मराठी लघुग्रंथाचे लोकार्पण !

हा ग्रंथ वाचतांना मला प्रत्येक वाक्यातून विषय समजत होता आणि आनंद होत होता. या ग्रंथाचे वाचन करतांना वाचकांना आनंद होईल आणि विषय कळेल. अध्यात्मातील इतर ग्रंथ वाचतांना विषय समजण्यासाठी मन एकाग्र करावे लागते. अध्यात्मातील विविध विषय इतक्या सोप्या भाषेत मांडणारा हा ग्रंथ कल्पनातीत आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले