अतिवृष्टिः अनावृष्टिः शलभा मूषकाः शुकाः ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥
– कौशिकपद्धति
अर्थ : (राज्यकर्ता धर्मनिष्ठ नसला की, प्रजा धर्मपालन करत नाही. प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे) अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.
तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
आगामी तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये कोट्यवधी लोक मृत्यू पावतील, अशा आशयाचे भाकीत नॉस्ट्रॅडॉमससारखे द्रष्टे भविष्यवेत्ते, प.पू. गगनगिरी महाराजांसारखे संत, महर्षी आदींनी केले आहे. सध्याच्या जागतिक घडामोडी पहाता आपत्काळ अगदी उंबरठ्यापर्यंत आला आहे. या दृष्टीने या सदरात आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे, त्या वेळी रक्षण होण्यासाठी ईश्वराची कृपा कशी संपादन करावी ?, त्याचप्रमाणे आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक, भौतिक आदी सिद्धता कशी करावी ? यांविषयी विवेचन केले आहे.
आपत्काळात अन्नधान्य, पाणी, औषधे, इंधन आदी वेळेवर उपलब्ध होणे कठीण होते. आपत्काळात कुटुंबासाठी लागणार्या नित्योपयोगी वस्तूंचा, तसेच वेळप्रसंगी लागणार्या वस्तूंचाही तुटवडा भासतो. आपत्काळाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या वस्तूंची खरेदी करणे सोपे जावे, या हेतूने पुढे विविध वस्तूंची सूची दिली आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वयोमान आणि घरातील खोल्यांची संख्या यांनुसार त्यांतील आवश्यक त्या वस्तू योग्य प्रमाणात खरेदी करून ठेवाव्यात. पुढील वस्तूंव्यतिरिक्त काही वेगळ्या वस्तू सुचल्या, तर त्याही खरेदी कराव्यात.
बर्याचदा समष्टी प्रारब्ध, सूक्ष्म जगतातील वाईट शक्तींचे पालटणारे डावपेच, कालचक्र इत्यादींमुळे आपत्काळाचा अवधी पुढे-मागे होत असला, तरी आपत्काळाला तोंड देण्यासाठी सर्वांनी नेहमीच सिद्ध असायला हवे.
विश्वविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॉमस तसेच संतांची आपत्काळाच्या संदर्भात भविष्यवाणी !
‘कोरोना’ सारखी महासंकटे आणि साधना
आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता
महायुद्ध, भूकंप, महापूर इत्यादींच्या स्वरूपातील महाभीषण आपत्काळ तर अजून यायचाच आहे. ‘तो येणार’, हे निश्चित असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. त्या संकटाचे पडघमही आता वाजू लागले आहेत. ‘कोरोना’ विषाणूची आपत्ती चीनमुळेच उद्भवली आहे’, असे सांगत अमेरिकेसह काही युरोपीय देशांनी चीनविरुद्ध दंड थोपटायला आरंभ केला आहे. थोडक्यात महायुद्ध आता निकट येत आहे. हा भीषण आपत्काळ काही दिवसांचा वा मासांचा नसून तो वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे आतापासून (वर्ष २०२० पासून) ३ वर्षांचा, अर्थात् भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत असेल. या आपत्काळात वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डीझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. त्यामुळे शासनयंत्रणा सर्वत्र साहाय्यासाठी पोचू शकत नाही. शासन करत असलेल्या साहाय्यकार्यात अडथळेही येतात. त्यामुळे स्वयंपाकाचा ‘गॅस’, खाण्यापिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळणार नाहीत वा मिळाल्या तरी त्यांचे ‘रेशनिंग’ होते. डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी सहजपणे उपलब्ध होणे कठीण असते. हे सर्व लक्षात घेऊन या आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक बनले आहे.
पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती
पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यास जलप्रलय (महापूर) होतो. अन्य ऋतूंमध्येही ढगफुटी झाल्यास जलप्रलय येऊ शकतो. वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील अनेक शहरे अतीवृष्टीमुळे जलमय झाली. बर्याच गावांना जोडणारे रस्ते खचल्याने वाहतूक ठप्प झाली. सहस्रो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, त्यात माणसे आणि गुरे-ढोरे, गाड्याही वाहून गेल्या. पेट्रोल, डिझेल, दूध आदी जीवनावश्यक वस्तू मिळणे दुर्लभ झाले. अकस्मात उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.
‘भविष्यात अशी स्थिती पुन्हा कधी उद्भवू शकेल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘पूरग्रस्त क्षेत्रांतील नागरिकांनी कशा प्रकारे पूर्वसिद्धता करावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.
आत्मबळ वाढवा !
जनतेने अनुभवलेली भयावह आपत्कालीन स्थिती !
मुद्रा आणि न्यास म्हणजे काय ?
आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी अवश्य वाचा !