आपत्काळाच्या दृष्टीने दैनंदिन (शारीरिक) स्तरावर करायच्या विविध सिद्धता !
कुटुंबासाठी लागणार्या नित्योपयोगी वस्तूंची, तसेच वेळप्रसंगी लागणार्या वस्तूंची खरेदी आतापासूनच करावी !
आपत्काळाच्या दृष्टीने कोणकोणत्या वस्तू घरात असाव्यात, हे काही वेळा एकदम सुचत नाही. वाचकांना अशा वस्तूंची खरेदी करणे सोपे जावे, या हेतूने पुढे विविध वस्तूंची सूची दिली आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वयोमान आणि घरातील खोल्यांची संख्या यांनुसार त्यांतील आवश्यक त्या वस्तू योग्य प्रमाणात खरेदी करून ठेवाव्यात. पुढील वस्तूंव्यतिरिक्त काही वेगळ्या वस्तू सुचल्या, तर त्याही खरेदी कराव्यात.