प्रयागराज महाकुंभमेळा 2025

13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी

सनातन संस्थेसह लावून ज्योत अंतरी भक्तीची,
घ्या अनुभूती दिव्यत्वाची !

Connect With Us

कुंभमेळा म्हणजे सनातन हिंदु धर्माच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक ! कुंभमेळा हिंदूंची शाश्वत अन् अतिप्राचीन परंपरा आहे. कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्‍या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जाणारा महाकुंभ हा कोट्यवधी श्रद्धाळूंची श्रद्धा आणि भक्ती ‍वाढवणारे व्यासपीठच आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, तेथे गंगास्नान, साधना, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. भाविकच नव्हे, तर देवता, ऋषी, संत अन् तेहतीस कोटी तीर्थे कुंभपर्वास येतात, हे सारे अद्वितीय आहे.

समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य निष्ठापूर्वक करणारी सनातन संस्था कुंभमेळ्यात येणार्‍या श्रद्धाळूंना साधनाविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्दिष्टाने नेहमी सहभागी होते. यावर्षी सनातन संस्था कुंभमेळ्यामध्ये योणाऱ्या कोट्यवधी श्रद्धाळूंना धर्माविषयी अमूल्य ज्ञान मिळावे या हेतूने प्रयागराज या कुंभक्षेत्री धर्मशिक्षण देणारे फलक, तसेच आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणार्‍या लोकांसाठी दीपस्तंभ असलेल्या सनातन-निर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावणार आहे. सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात येणार्‍या प्रदर्शन कक्षाला भेट देणार्‍या जिज्ञासूंना सनातन-निर्मित ग्रंथांतील ज्ञानाचा लाभ स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी करून घेण्याची संधी मिळणार आहे. याच समवेत संस्थेच्या वतीने जिज्ञासूंसाठी प्रतिदिन साधनेविषयी प्रवचने आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रवचनांतून भा‍विकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात साधना कशी करा‍वी, त्याचे महत्व काय, आनंदी कसे रहावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्था उपस्थित भाविकांची हिंदु धर्मावरील श्रद्धा दृढ होण्यासाठी, तसेच त्यांना सनातन हिंदु धर्मानुसार आचरण करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणार आहे.

महाकुंभ मेळ्यातील सनातन संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्या !

1.

धर्माची शिकवण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन

2.

साधनेतील मूलभूत सिद्धांत विषद करणारे सत्संग

3.

साधू, संत यांचे स्वागत अणि त्यांची भेट घेणे

4.

राष्ट्र, धर्मावर आधारीत सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन

5.

आनंदी जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारे सत्संग

6.

स्वच्छ कुंभ, सात्त्विक कुंभ मोहीम राबवणे

कार्यक्रमांचे वेळापत्रक

महाकुंभ मेळ्यातील सनातन संस्थेच्या विविध उपक्रमांत सहभागी होऊन आत्मज्ञानाची अनुभूती घ्या !

महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेने व्यक्तीने स्‍वतःत परिवर्तन करण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हा ! प्रतिदिन सत्संगांच्या माध्यमातून साधनेविषयी मूलभूत माहिती जाणून घ्या, तसेच साधना सत्संगांच्या माध्यमातून आनंदी जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन घ्या. हिंदु धर्माची सखोल माहिती देणारे धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन, तसेच राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार इत्यादी अनेक विषयांवरील सनातन-निर्मित ग्रंथ प्रदर्शन यांचा लाभ घ्या ! धर्माचरण करून स्वतःच्या साधनाप्रवासाला आरंभ करण्यासाठी संस्थेच्या कार्यात सहभागी व्हा !

Image of a poster exhibition by Sanatan Sanstha on education on Dharma

उद्घाटन

१० जानेवारी २०२५

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित शिबिर आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांचा शुभारंभ !
स्थळ : मोरी-मुक्ती मार्ग चौराहा, सेक्टर १९, प्रयागराज.

Image of Sanatan Sanstha National Spokesperson answering questions from the audience in a Satsang

नियमित सत्संग

१३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२५

प्रतिदिन साधनेच्या मूलभूत तत्त्वांची माहिती देणारे लघु सत्संग. यामध्ये जिज्ञासूंचे शंकानिरसन आणि आध्यात्मिक जीवनशैली जगण्याचे मार्गदर्शन केले जाईल.

Image of a Sanatan Sanstha free satsang on practical spirituality

साधना सत्संग

९ फेब्रुवारी २०२५

जिज्ञासू आणि साधक या सर्वांसाठी लाभदायक असलेला आनंदी जीवन कसे जगावे या विषयावरील आधारित अनमोल सत्संग.

Image of a book stall by Sanatan Sanstha with Sanatan's publications on display

पुस्तकांचे प्रदर्शन

६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२५

राष्ट्र, धर्म, अध्यात्म, हिंदु संस्कृती इत्यादी विविध विषयांवर आधारित सनातन-निर्मित ३६६ ग्रंथ १३ भाषांमध्ये येथे उपलब्ध आहेत.

अध्यात्मप्रसार आणि धर्मजागृती हेतु

अर्पण करा !

आपल्या क्षमतेनुसार या कुंभपर्वात धर्मदान करून
पुण्य मिळवा !

जानेवारी २०२५ मध्ये आरंभ होणार्‍या महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेचे २०० हून अधिक साधक सनातन धर्माची सेवा करणार आहेत. यामध्ये धर्म आणि संस्कृती टिकवण्यासाठी मार्गदर्शक पुस्तकांचे प्रदर्शन लावणे, धर्मशिक्षण देणाऱ्या फलकांचे प्रदर्शन लावणे, जिज्ञासूंना साधनेतील पुढील मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रतिदिन सत्संगांचे आयोजन करणे, तसेच सामान्य मनुष्याला या धकाधकीच्या आयुष्यात आनंदी जीवन जगण्यासाठी अमूल्य असे मार्गदर्शन करणे, यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे. कुंभमेळ्यात ४० कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. संस्थेचे साधक महाकुंभच्या पवित्र क्षेत्रात स्वच्छता रहावी आणि उपस्थितांना सात्त्विक वातावरणाचा लाभ मिळावा या दृष्टीने कार्यरत असतील. हे प्रचंड कार्य यशस्वी करण्यासाठी आवश्यक साधने आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास तुमचे अर्पणरूपी योगदान साहाय्यभूत ठरणार आहे.

हिंदु धर्मशास्त्रानुसार प्रयागराज येथील पवित्र भूमीतील महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने अर्पण दिल्यास दान करणार्‍या व्यक्तीला अत्यधिक पुण्य मिळते. आपल्या क्षमतेनुसार धन, अन्नधान्य अथवा इतर अत्यावश्यक वस्तू असे कोणत्याही स्वरूपात दान करून या धर्मकार्यात हातभार लावा.

निवासव्यवस्था

₹19,35,000

ब्लँकेट, गाद्या, चादरी, उशा, थर्मल इन्सुलेशन, निवासासाठी तंबू / फ्लॅट, जनरेटर आणि इनव्हर्टर

भोजन

₹28,50,000

२०० साधकांसाठी अल्पाहार आणि भोजन, पाहुण्यांसाठी भोजन अन् अल्पाहार, तसेच पिण्याचे पाणी.

प्रदर्शन

₹26,00,000

तंबू, कनात, फलक, प्रसिद्धी फलक, २०० टेबल आणि खुर्च्या, तसेच लाल अन् हिरव्या सतरंज्या.

प्रसिद्धी

₹4,85,000

वृत्तपत्रे, टी.व्ही या माध्यमांतून पत्रकार परिषद आणि इतर उपक्रम यांची माहिती प्रसारित करणे. होर्डिंग, भित्तीपत्रके आणि निमंत्रण पत्रिका यांची छपाई.

ध्वनीक्षेपण यंत्रणा आणि वीज जोडणी

₹10,25,000

सत्संगासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणा, हॅलोजन, विद्युत् उपकरणे, प्रोजेक्टर आणि स्क्रीन्स्.

इतर

₹ 17,05,000

व्यासपीठ, ५ चारचाकी आणि १० दुचाकी गाड्यांसाठी इंधन, औषधे अन् स्टेशनरी

Payment Options

GPay
BHIM
PhonePe
Cr/Dr Cards
Net Banking

सनातन संस्थेविषयी साधु-संतांनी काढलेले गौरवोद्गार

मागील कुंभमेळ्यांतील सनातन संस्थेचे कार्य

महाकुंभ मेळा 2025 मधील राजसी स्नानाच्या दिनांक

13

जानेवारी 2025

पौष पौर्णिमा

14

जानेवारी 2025

मकरसंक्रांत

29

जानेवारी 2025

मौनी अमावास्या

03

फेब्रुवारी 2025

वसंत पंचमी

12

फेब्रुवारी 2025

माघ पौर्णिमा

26

फेब्रुवारी 2025

महाशिवरात्र

ग्रहगणितानुसार चार कुंभक्षेत्री भरणारा कुंभमेळा

हरद्वार (हरिद्वार) कुंभमेळा

जेव्हा सूर्य मेष राशीत असतो आणि गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो.

हरद्वार (हरिद्वार) कुंभमेळ्याच्या वेळी सूर्याकडून येणार्‍या तेजलहरींमध्ये स्थूलदेहाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असणे, तर गुरुकडून येणार्‍या लहरी मनोदेहाचे शुद्धीकरण करण्यासाठी पूरक आणि
पोषक असणे

प्रयाग कुंभमेळा

जेव्हा वृषभ राशीत गुरु आणि मकर राशीत चंद्र अन् सूर्य असतात

येथील त्रिवेणी संगमावर प्रत्येक १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. या कुंभपर्वात मकरसंक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे असतात. माघी पौर्णिमा या दिवशी पर्वकाळ मानला जातो. या चारही पर्वांच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. या दिवशी प्रयागतीर्थात स्नान केल्याने १ सहस्त्र अश्वमेध, १०० वाजपेय आणि पृथ्वीभोवती १ लक्ष प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळते.

उज्जैन कुंभमेळा

जेव्हा सूर्य मेष राशीत आणि गुरु सिंह राशीत असतो.

उज्जैन येथील कुंभमेळा क्षिप्रा नदीच्या काठावर भरतो. उत्तरवाहिनी असलेली ही पवित्र नदी ज्या ठिकाणी पूर्ववाहिनी होते, त्या ठिकाणी प्राचीन काळी एकदा तिला गंगा मिळाली होती. आज तेथे गणेश्‍वर नावाचे शिवलिंग आहे. तसेच स्कंदपुराणात क्षिप्रा नदीला गंगा मानले आहे.

त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा

जेव्हा गुरु आणि सूर्य हे दोन्ही सिंह राशीत येतात.

त्र्यंबकेश्‍वर-नाशिक येथील कुंभमेळा गोदावरी नदीच्या काठावर भरतो. गौतमऋषींनी गंगेला ‘गोदावरी’ या नावाने त्र्यंबकेश्‍वर-नाशिक क्षेत्री आणले. ब्रह्मपुराणात ‘विंध्य पर्वताच्या पलीकडील गंगा ही गौतमी (गोदावरी) या नावाने ओळखली जाते’, असे म्हटले आहे.

कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व

साधनेचे १,००० पट फल देणारे कुंभपर्व !
1
पुण्य फलाची प्राप्ती

कुंभमेळ्यात स्नान केल्याने १ सहस्र अश्‍वमेध, १०० वाजपेय आणि पृथ्वीभोवती १ लक्ष प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळते, तसेच १ सहस्र कार्तिक स्नान, १०० माघ स्नान आणि नर्मदेवरील १ कोटी वैशाख स्नान यांच्याएवढे एका कुंभस्नानाचे फळ आहे.

2
कृती आणि कर्म यांची शुद्धी होणे

कुंभमेळ्याच्या काळात पुण्य-लहरींचे भ्रमण सर्वत्र असल्याने मानवाच्या मनाचे शुद्धीकरण होऊन त्यात निर्माण होणार्‍या विचारांयोगे कृतीही फलदायी होते, म्हणजेच कृती आणि कर्म दोन्ही शुद्ध होतात.

3
आशीर्वाद मिळणे

गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी अन् क्षिप्रा या नद्यांच्या क्षेत्री कुंभमेळा असतो. नदीच्या पुण्यक्षेत्री वास करणार्‍या अनेक देवता, पुण्यात्मे, ऋषिमुनी, कनिष्ठ गण यांनाही या वेळी जागृती आलेली असल्याने यांचा आशीर्वाद मिळण्यासही साहाय्य होते.

4
पितृतर्पण

गंगेचे प्रयोजनच मुळी ‘पितरांना मुक्ती देणे’ हे आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात गंगास्नानासह पितृतर्पण करण्याची धर्माज्ञा आहे. वायुपुराण मध्ये कुंभमेळा श्राद्ध-कर्मासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले आहे.

5
पापक्षालक

पवित्र तीर्थक्षेत्रांत स्नान करून पापक्षालन करावे, या हेतूने अनेक भाविक कुंभमेळ्यात कुंभक्षेत्री स्नान करतात. तीर्थराज प्रयागचे दर्शन घेणे, येथे नामजप करणे, तसेच येथील मातीला स्पर्श करणे, यांनी मनुष्य पापांपासून मुक्त होतो (मत्स्यपुराण, अध्याय १०४, श्‍लोक ११).

6
ईश्‍वरीय ऊर्जा शरिरातून वहाणे

कुंभपर्वाचा संबंध खगोल आणि भूगोल यांच्याशी आहे. कुंभमेळ्याच्या वेळी असणार्‍या ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे वैज्ञानिक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा कुंभमेळ्याच्या ठिकाणी जलप्रवाहात प्रवाहित होते. अशा नदीत स्नान केल्याने ती ईश्‍वरीय ऊर्जा आपल्या शरिरातून वाहू लागते.

7
संत सत्संग

कुंभमेळ्यात भारतातील शंकराचार्य, १३ आखाड्यांचे साधू, महामंडलेश्‍वर, विद्वान, संन्यासी, संत-महात्मे येतात. त्यामुळे कुंभमेळ्याचे स्वरूप अखिल भारतवर्षातील संत संमेलनासारखे भव्यदिव्य असते. कुंभमेळ्यामुळे भाविकांना संतसत्संगाची सर्वांत मोठी संधी उपलब्ध होते.

8
कार्यसिद्धी अल्प कालावधीत होणे

कुंभमेळ्याच्या काळात अनेक देवी-देवता, मातृका, यक्ष, गंधर्व आणि किन्नरही भूमंडलाच्या कक्षेत कार्यरत असतात. साधना केल्याने या सर्वांचा आशीर्वाद मिळून आपली कार्यसिद्धी अल्प कालावधीत होते.

तुम्ही प्रयागराज महाकुंभ २०२५ येथे जाणार आहात ?

मग आम्हाला अवश्य संपर्क करा…

Book Stall
Main Shivir
Poster Exhibition

Walkthrough video

अवश्य वाचा

कुंभमेळा, तीर्थक्षेत्रे, गंगा नदी यांविषयी सनातन-निर्मित पुस्तके
गंगामाहात्म्य (आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)

गंगामाहात्म्य

कुम्भपर्व की महिमा

तीर्थक्षेत्रे आणि तीर्थयात्रा यांचे महत्त्व

तीर्थक्षेत्रे आणि तीर्थयात्रा यांचे महत्त्व

कुंभमेळ्या विषयी वाचा सर्व माहिती !

साधारणता लोकांच्या मनात कुंभ मेळ्याविषयी उद्भवणारे विविध प्रश्न आणि त्यांची उत्तरे येथे दिली आहेत. यामुळे तुमच्याही शंकांचे निरसन होईल अशी आम्ही आशा करतो.

कुंभमेळा, कुंभक्षेत्र आणि त्यांचे धार्मिक महत्त्व

कुंभमेळा आखाडे

कुंभमेळ्यातील सनातन कार्य

कुंभमेळा व्हिडीआे (Kumbh videos)

Kumbhmela : Sanatan Sanstha Activities

‘Kumbh’ means a pot which is a symbol of purity/ sacredness and well-being

‘Kumbh Mela’ is the biggest religious fair in the world