अध्यात्म आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व

कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते. मनुष्याची धडपड जास्तीतजास्त सुख कसे मिळेल, यासाठी असते. याकरता प्रत्येक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे विषयसुख उपभोगण्याचा प्रयत्‍न करतो; परंतु विषयसुख हे तात्कालिक आणि निकृष्ट प्रतीचे असते, तर आत्मसुख, अर्थात आनंद हा चिरंतन अन् सर्वोच्च प्रतीचा असतो. ते आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे ‘अध्यात्म’.

अध्यात्माचे इतके महत्त्व असतांना खेदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च आनंद आणि सर्वज्ञता देणार्‍या या विषयाकडे फारच थोडे जण वळतात. विषयसुखाच्या अनंतपटीने आनंद असतो, हे कळले तर विषयसुखापेक्षा आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्‍न करील. असे प्रयत्‍न व्हावेत, हाच उद्देश मनात ठेवून पुढील भाग वाचावा !

अध्यात्माचे मानवी जीवनातील महत्त्व कळण्यासाठी सर्वप्रथम मानवाचे ध्येय, तसेच मानवी जीवनासंबंधी अन्य काही गोष्टी यांविषयी थोडे जाणून घेऊ.

१. मानवाचे ध्येय – चिरंतन आणि सर्वोच्च आनंदाची प्राप्ती
२. सुख- दुःखाची कारणे
३. दुःखाचे कारण बुद्धीअगम्य म्हणजे आध्यात्मिक आहे, हे बुद्धीने कसे ओळखायचे ?
४. मनुष्याचा जन्म पुनःपुन्हा का होतो ?
५. जीवनातील ८० टक्के समस्यांची कारणे व त्यावरील उपाय काय ?

अधिक माहिती वाचा…

आनंद मिळावा, अशी इच्छा का होते ?

मानवाला अध्यात्माची आवड का असते ?
विज्ञान आणि अध्यात्म यांतील मूलभूत भेद
सुखाचे प्रकार
जिवाला आनंदाचा कंटाळा का येत नाही ?

दु:ख पूर्णत: कसे टाळता येईल ?

दु:ख : महत्त्व आणि लक्षणे
दु:ख पूर्णत: कसे टाळता येईल ?
सुखदु:ख आणि जीवन
सुख, दुःख आणि आनंद यांतील भेद

अध्यात्म : चिरंतन आणि सर्वोच्च आनंद देणारा विषय

‘सुख पहाता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।’ याचा अनुभव बहुतेकांना असतो. कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. मनुष्याचीच नव्हे, तर अन्य प्राणीमात्रांचीही धडपड जास्तीतजास्त सुख कसे मिळेल, यासाठी असते. याकरता प्रत्येक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे विषयसुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो; परंतु विषयसुख हे तात्कालिक आणि निकृष्ट प्रतीचे असते, तर आत्मसुख, अर्थात आनंद हा चिरंतन अन् सर्वोच्च प्रतीचा असतो. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म.

आपल्याला सदोदित सर्वोच्च सुख मिळावे, असे सूक्ष्मातीसूक्ष्म प्राण्यापासून सर्वांत प्रगत अशा मनुष्यप्राण्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी त्याची क्षणोक्षणी धडपड चालू असते. चिरंतन सर्वोच्च सुख (यालाच आनंद म्हणतात.) कसे प्राप्त करून घ्यायचे, हे शिकवणारे शास्त्र, म्हणजे अध्यात्मशास्त्र.

अधिक माहिती वाचा…

आनंद कसा मिळवायचा ?

आनंद कसा मिळवायचा ?

शिक्षणात अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही !

शिक्षणात अध्यात्मशास्त्र
शिकवण्याला पर्याय नाही !
शैक्षणिक क्षेत्रात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले गुणवंत आणि अध्यात्मशास्त्रात प्रगती झालेले उन्नत यांच्यातील भेद
साधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक !

अध्यात्मविषयी शंकानिरसन

साधनाविषयी शंकानिरसन
कर्मकांडाविषयी शंकानिरसन
नामजपाविषयी शंकानिरसन
शंकानिरसन (अन्य विषय)

अधिक माहिती वाचा…

साधना सुरू केल्यावर आलेल्या अनुभूती

सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेमुळे मद्यपानाचे व्यसन सुटणे !
सनातनच्या साधकाने केलेल्या मार्गदर्शनामुळे कुलदेवीचे नाव कळणे
देवावर विश्‍वास बसून धर्माचरण करू लागणे आणि साधनेला आरंभ होणे
सनातन संस्थेच्या धर्मशिक्षणवर्गामुळे आणि दत्ताच्या जपामुळे घरात आनंद अनुभवणे !

अधिक माहिती वाचा…

संबंधित ग्रंथ

  • अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन
    99110
    Buy Now
  • आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म (सुख, दुःख अन् आनंद यांचे शास्त्रीय विश्लेषण)
    6875
    Buy Now
  • आधुनिक विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ ! ( अध्यात्माविषयीच्या अपसमजांच्या निराकरणासह )
    7280
    Buy Now
  • साधनेचे महत्त्व आणि प्रकार (अध्यात्मशास्त्रीय विवेचन )
    7785
    Buy Now