हिंदु राष्ट्र
हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदुहित जपले जाणारे राष्ट्र ! धर्म हाच या राष्ट्रात केंद्रबिंदू असेल ! हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे केवळ राजकारण नाही, तर धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती असेल ! राजकारण, अर्थकारण, संरक्षण, विज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रांत हे ‘हिंदू राष्ट्र’ आदर्श असेल आणि त्यातील जनतेला रामराज्याची अनुभूतीदेखील येईल ! त्यागी अन् राष्ट्रोद्धाराची भावना बाळगणारा धर्माचरणी समाज, प्रजेच्या रक्षणार्थ अहोरात्र झटणार्या सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली, कार्यक्षम प्रशासन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धर्मनिष्ठा अन् राष्ट्रनिष्ठा बाळगणारे समाजहितासाठी निःस्पृहपणे राज्य करणारे राज्यकर्ते, ही या हिंदूराष्ट्राची मानचिन्हे असणार आहेत. येत्या दीड-दोन दशकांतच रामराज्याची झलक दाखवणारे हे धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन होईल.
हिंदु राष्ट्र कसे असेल यासाठी अवश्य वाचा … धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र !