गुरुपौर्णिमा (Gurupurnima 2024)
गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।
गुरुपौर्णिमेचा ऑनलाईन कार्यक्रम पाहून तुम्हाला काय वाटले ? आपले अभिप्राय खालील फॉर्म मध्ये लिहा.
गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा २१ जुलै २०२४ या दिवशी आहे. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. अशा गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.
प्रतिवर्षी अनेक जण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात. सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमेचा ऑनलाईन कार्यक्रम येथे लाईव्ह पहा !
देवाने ह्रदयात सगळे भाव दिले; पण समाधान (आनंद किंवा शांती) केवळ गुरुच देतात. देवाने ते दिले नाही.
– प.पू. भक्तराज महाराज
गुरुपौर्णिमा महोत्सव
WATCH LIVE
July 21, 2024, 5:30 PM
July 21, 2024, 7:30 PM
July 21, 2024, 8.00 PM
July 21, 2024, 7:30 PM
July 21, 2024, 6:00 PM
July 21, 2024, 4:30 PM
गुरुपौर्णिमा महत्त्व
‘गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय !
गुरुपौर्णिमा या दिवशी गुरु तत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरु कृपेची (ईश्वर कृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.
गुरुपौर्णिमा संत संदेश
हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था
श्री गुरूंवरील निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती वाढवा !
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उत्तराधिकारी, सनातन संस्था
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी लागणारी सद्गुणांची शिदोरी जमा करा !
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उत्तराधिकारी, सनातन संस्था
गुरुपौर्णिमेचा लाभ होण्यासाठी गुरुचरणी तन-मन-धन यांचा त्याग करा !
गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत
प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षि व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतियांची धारणा आहे.
गुरु पूजन
गुरुपौर्णिमा या दिवशी भावपूर्णरित्या गुरु पूजन करावे. संपूर्ण गुरु पूजन त्यातील मंत्र आणि त्यांच्या अर्थासहित जाणून घेण्यासाठी…
गुरु-शिष्य परंपरा
गुरु-शिष्य परंपरा’ म्हणजे भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य होय ! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील.
सनातनची गुरु परंपरा
गुरूंप्रती भाव वाढवण्यासाठी हे करा !
गुरु-शिष्य संबंधी ग्रंथ
गुरूंचे महत्त्व, गुरूंचे प्रकार, गुरुमंत्र, गुरूंचे शिष्यांना शिकवणे, गुरु-शिष्य संबंध, आदर्श शिष्य कसे बनावे या संबंधी अनमोल मार्गदर्शन करणारे ग्रंथ वाचा !