साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’ या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग अशा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसुलभ मार्ग आहे. प्रस्तुत लेखात गुरुकृपायोग या योगाची निर्मिती, त्याचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना यांविषयी माहिती विशद करण्यात आली आहे.
गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे
अष्टांग साधनेच्या टप्प्यांचा निकष साधकाच्या गुणवत्तेवर अवलंबून असणे
अ. निकष १ – साधकामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं असणे : अशा साधकाने अष्टांग साधनेच्या पुढील टप्प्यांनुसार प्रयत्न करावेत –
१. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन,
२. अहं-निर्मूलन,
३. नामजप,
४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न,
५. सत्संग,
६. सत्सेवा,
७. सत्साठी त्याग आणि
८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)
आ. निकष २ – साधकामध्ये भक्तीभाव असणे : भक्तीप्रधान वृत्ती असलेल्या साधकाने अष्टांग साधनेच्या पुढील टप्प्यांनुसार प्रयत्न करावेत.
१. नामजप,
२. पुढच्या टप्प्याचा भक्तीभाव जागृत करण्यासाठी करायचे प्रयत्न,
३. सत्संग,
४. सत्सेवा,
५. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन,
६. अहं-निर्मूलन,
७. सत्साठी त्याग आणि
८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम)
१. व्यष्टी साधना
१. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन | ५. सत्संग |
२. अहं-निर्मूलन | ६. सत्सेवा |
३. नामजप | ७. सत्साठी त्याग |
४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न | ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम) |
२. समष्टी साधना
अहं निर्मूलन
नामजप
भावजागृती
सत्संग
सत्सेवा
त्याग
प्रीती म्हणजे काय ?
गुरुकृपायोगाचे महत्त्व सांगणारे लेख
गुरुकृपायोग साधना मार्गानुसार साधना करुन झालेले संत
गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकांनी अनुभवलेला पालट
आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आतापासूनच आरंभ करा !
सनातन संस्थेच्या ‘साधना संवाद’साठी आताच नोंदणी करा !
संबंधित ग्रंथ
आदर्श शिष्य कसे बनावे ?गुरूंचे महत्त्वगुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र