दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दिवाळी उत्सव सुरू आहे. दिवाळी भारतातच नव्हे तर विदेशातही जोमाने साजरी केली जाते.
आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत.
दिवाळी संबंधित लेख
दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र धनत्रयोदशी या लेखातून जाणून घेऊया.
आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती तसेच संपूर्ण पुजाविधी अवश्य वाचा श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधी
नरक चतुर्दशी, यमदीपदान पूजाविधी, बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा), भाऊबीज (यमद्वितीया) यांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा.
दिवाळीला दारात आकाशकंदिल लावतात. आकाशकंदिल लावल्यामुळे घराची शुद्धी होते. लहान मुले धर्माभिमान जागृत व्हावा म्हणून किल्ले बांधतात.
प्रतिवर्षी देशभरात केवळ फटाक्यांवर अब्जावधी रुपयांचा व्यय होत असतो. कानाचे पडदे फाडणारे, हृदयरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा श्री गणेश चतुर्थी, दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. फटाक्यांमुळे होणारा विनाश स्वतःहून ओढवून घेण्याचा अट्टाहास आपण कशासाठी करतो ?
भजन, आरती किंवा सात्त्विक नाद यांनी चांगल्या शक्ती आणि देवता येतात; मात्र सध्या तामसिक आधुनिक संगीत आणि फटाके यांचेच ध्वनी अधिक प्रमाणात होत असल्यामुळे वातावरणात अनिष्ट शक्ती आकर्षिल्या जातात. त्यांच्यातील तमोगुणाचा परिणाम मानवावर होतो आणि त्याची वृत्तीही तामसिक होते.
वरील सर्वच विषयांची माहिती अवश्य वाचा…