अध्यात्मविषयी शंकानिरसन !
अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाल्याविना साधना नीट होत नाही. या दृष्टीने जगभरातील जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक अन् प्रायोगिक भागांविषयी सर्वसाधारणपणे उद्भवणार्या (आत्मा, मुक्ती, मोक्ष, वेद, देवता, प्रारब्ध आदी) शंकांचे निरसन या सदरातून होईल. त्याचप्रमाणे स्त्रियांनी गुरुचरित्र किंवा गायत्री मंत्र का म्हणू नये, कर्मकांडातील नियम, तसेच धर्मभ्रष्टांच्या शुद्धीकरणासंबंधी हिंदु धर्मशास्त्र काय सांगते ? आदींचे शास्त्रीय विवेचनही येथे केले आहे.