‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. ‘कोरोना विषाणूं’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली. मी शोधलेले जप गेल्या एक वर्षापासून साधकांना त्यांच्या विकारांवर देत आहे. ‘त्या जपांचा त्यांना चांगला लाभ होत आहे’, असे त्यांनी सांगितल्यावर लक्षात आले. ते ते विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत.
साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचारांसमवेत ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा. या नामजपाच्या संदर्भात येणार्या अनुभूती साधकांनी sankalak.goa@gmail.com या इ-मेल पत्त्यावर किंवा पुढील टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात. साधकांच्या या अनुभूती ग्रंथात घेण्याच्या दृष्टीने, तसेच नामजपाची योग्यता कळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.टपालाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१.
टीप : एखाद्या विकारासाठी दिलेले नामजप त्या क्रमाने म्हटले की, तो एक नामजप झाला. असा हा नामजप नियोजित कालावधी पर्यंत पुनःपुन्हा करावा.

‘Search by Disease’ या ठिकाणी विकाराचे नाव किंवा लक्षणे इंग्रजी किंवा मराठी भाषेत टाईप करावे. त्या विकारावर नामजप उपलब्ध असल्यास दाखवण्यात येईल. किंवा आपण Show च्या पुढे 15 rows वरही क्लिक करून Show all वर क्लिक करू शकतात. जेणेकरून उपलब्ध असलेले सर्व जप दाखवण्यात येईल.
टीप : एखाद्या विकारासाठी दिलेले नामजप त्या क्रमाने म्हटले की, तो एक नामजप झाला. असा हा नामजप नियोजित कालावधी पर्यंत पुनःपुन्हा करावा.
साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचारांसमवेत ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा. या नामजपाच्या संदर्भात येणार्या अनुभूती साधकांनी sankalak.goa@gmail.com या इ-मेल पत्त्यावर किंवा पुढील टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात. साधकांच्या या अनुभूती ग्रंथात घेण्याच्या दृष्टीने, तसेच नामजपाची योग्यता कळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.टपालाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१.
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांचा परिचय
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला शरणागतभाव, जन्मतःच अल्प अहं आणि प्रेमभाव, ही सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूत्ररूपात सांगितलेल्या विषयांवर ते असे लेखन करतात की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात असलेले सर्व विचार त्या लेखनात उतरतात !
‘रसायनशास्त्र’ या विषयात ‘डॉक्टरेट’ असलेल्या सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी जून २००० मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेस आरंभ केला. सनातनच्या सत्संगात साधना करण्याचे महत्त्व कळल्यावर त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले आणि सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येऊन पूर्णवेळ साधना चालू केली. प्रारंभी ३ वर्षे त्यांनी दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संपादकीय विभागात सेवा केली. तसेच ग्रंथ-विभागात संकलन करण्याची सेवाही करतात. सध्या ते विविध त्रासांवर आध्यात्मिक उपाय शोधण्याची सेवा करतात.

सूक्ष्म-स्तरावर प्रचंड कार्य करण्याची अद्वितीय क्षमता असणारे एकमेवाद्वितीय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळे सनातनचे कार्य विविधांगांनी वाढत आहे. प्रथम या कार्यामध्ये मी काही सेवा केल्या. त्यानंतर त्या सेवा अनेक साधकांनी शिकून घेतल्या आणि आज ते साधक दायित्व घेऊन त्या सेवा करत आहेत, उदा. अध्यात्मप्रसाराचे कार्य, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके ! याचाच एक भाग म्हणून सप्तर्षींनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना माझ्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित केले. या दोघी माझी साधकांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याची सेवा उत्तमरित्या करत आहेत. तशीच ‘सूक्ष्मातून होणार्या आक्रमणांसाठी करावयाचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय’, ही एक मोठी सेवा सध्या सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ करत आहेत.
साधकांना त्यांच्या त्रासानुसार आवश्यक ते नामजपादि उपाय शोधून सांगणे, त्यांच्यासाठी नामजपादि उपाय करणे यांपासून समष्टीसाठी आवश्यक जप शोधून सांगणे, सत्संग, धर्मसभा यांसारख्या समष्टी कार्यात सूक्ष्मातून निर्माण होणारे अडथळे दूर होण्यासाठी नामजप करणे, या सेवा ते नियमित करत आहेत. त्यांनी विविध आजारांसाठी उपयोगी पडतील, असे विविध देवतांचे नामजपही स्वतः शोधून काढले आहेत आणि अनेक साधकांना त्यांचा लाभ होत आहे.
त्यांनी कोरोना महामारीवरही नामजप शोधून दिला. त्याचा अनेकांना लाभ झाला. समाजातील लोकांनाही या नामजपाचा परिणाम जाणवून ध्वनीमुद्रित केलेला हा नामजप कोरोनाच्या संदर्भातील अनेक रुग्णालयांमध्ये लावला जात होता. या महामारीच्या कालावधीत आध्यात्मिक स्तरावरील लढ्यात त्यांनी प्रतिदिन अनेक साधकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार नामजपादी उपाय शोधून सांगितले. या नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांनी अनेक साधकांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. सद्गुरु काकांनी नामजपादि उपाय सांगितल्यावर किंवा त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर परिणाम झाला नाही, असे कधीच होत नाही. हा अनुभव आजवर अनेक साधकांनी घेतला आहे.
गेल्या काही काळापासून माझा महामृत्यूयोग चालू आहे. त्यामुळे माझ्यावर सतत वाईट शक्तींची सूक्ष्मातून तीव्र आक्रमणे होत आहेत. या आक्रमणांमुळे काही काळापूर्वी माझी कोणतीही वस्तू इतर साधकांनी हातात धरली, तर त्यांना ‘डोके जड होणे, श्वास थांबणे’, यांसारखे त्रास जाणवत होते. माझ्या नियमित वापरातील वस्तूंचे यु.ए.एस्.द्वारे संशोधन केल्यावरही त्या वस्तूंवर १० ते १५ मीटरपर्यंत नकारात्मक उर्जेचे आवरण येत होते. माझ्या अशा तीव्र नकारात्मक झालेल्या वस्तूंवर सद्गुरु काकांनी काही काळ उपाय केल्यावर त्या लगेच सकारात्मक होत होत्या.
सूक्ष्मातून होणार्या तीव्र आक्रमणांमुळे मला ग्लानी येणे, प्राणशक्ती अल्प होणे, यांसारखे त्रास वारंवार होत आहेत. माझ्या अशा स्थितीमध्ये सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांनी अनेकदा माझ्यावर उपाय करून या वाईट शक्तींच्या आक्रमणाची परिणामकारकता अल्प केली आहे. ते माझी प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा यांना नारळाने दृष्ट काढतात. ते दृष्ट काढत असतांना माझ्या सभोवती फिरत असतांना त्यांची स्पंदने मला जाणवतात. इतकी त्यांच्यामध्ये शक्ती आहे.
आजवरच्या गुरु-शिष्यांच्या इतिहासामध्ये शिष्याने गुरूंना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य केल्याचे उदाहरण आढळत नाही. त्यामुळे, सप्तर्षींनी जसे माझ्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत, असे सांगितले आहे, तसे ‘सूक्ष्मातील उपायांचे उत्तराधिकारी सद्गुरु गाडगीळकाका आहेत’, असे सांगतील, असे मला वाटते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.८.२०२२)