२. साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने दिलेल्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

भगवान श्रीकृष्णाने मुरुगादेवाला (कार्तिकस्वामीला) स्वतः दुग्धाभिषेक करणे : उपास्यदेवतेची भक्ती कशी करायची, हे मला कळत नाही. मी लहान मुलगी पूजा-अर्चा करू शकत नाही, असा बालिकेच्या मनातील शरणागतभाव ओळखून श्रीकृष्णाने तिच्यासाठी तिच्या उपास्यदेवतेला दुग्धाभिषेक केला.

भगवंताच्या चरणी केलेल्या चित्ररूप प्रार्थना ! : १ – माझ्यामध्ये माता यशोदेचा वात्सल्यभाव, २ – राधेचे निरपेक्ष प्रेम (प्रीती), ३ – मीरेचा समर्पणभाव, ४ – द्रौपदीचा याचकभाव आणण्यास मला शिकव, ५ – तसेच तू धनुर्धारी अर्जुनाला जसे मार्गदर्शन केलेस, तसे आम्हाला या धर्मयुद्धात मार्गदर्शन कर.

मानसपूजा करणे : मी फार लहान असल्याने षोडषोपचार पूजा करू शकत नाही, तरीसुद्धा माझ्या ईश्वराची पूजा मला करायची असल्याने मी ती मानसरित्या केली.

श्रीकृष्णाच्या सगुण रूपासमोर, म्हणजेच प.पू. डॉक्टरांसमोर आत्मनिवेदन करणे : साधिकेला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवत होता, त्या वेळी शरणागतभाव दर्शवणारे हे चित्र तिने काढले. चित्र काढतांना तिला पुष्कळ शांत वाटत होते.

श्रीकृष्णाच्या चरणी क्षमायाचना करतांना स्वतःचा स्वीकार करण्यासाठी साधिकेने विनवणी करणे

एक दिवस श्रीकृष्णाने त्याची मान आणि खांदे दुखत असल्याचे निमित्त केले. सर्वशक्तीमान आणि अजिंक्य असा माझा भगवंत माझ्यासाठी सर्वस्व असल्याने त्याला दुःख होत असलेले मी पाहू शकत नव्हते. त्यामुळे मी माझ्या इवल्या इवल्या हातांनी त्याची मान आणि खांदा यांठिकाणी मर्दन (मालिश) करू लागले.

साधिकेचा वात्सल्यभाव व्यक्त होणार्‍या कृती ! : बाल्यावस्थेच्या तबकात वात्सल्यभावाचे निरांजन, कधी पंचारती, तर कधी कापुरारती बनून भगवंताचे केलेले हे पूजन आहे. वात्सल्यभाव रसाने नटलेल्या नवविधाभक्तींच्या नऊ सुमनांना गुंफून वात्सल्यभक्तीचा हार बनवून तो श्रीकृष्णाला अर्पण केला आहे.

श्रीकृष्ण पहुडला असून त्याचे पाय चेपतांना स्वतः एक प्रौढ माता असल्याप्रमाणे जाणवणे : चित्र पूर्ण होईपर्यंत श्रीकृष्ण उभा असल्याने आता तो आराम करण्यासाठी पहुडलेला आहे. श्री महालक्ष्मी श्रीविष्णूशी एकरूप झाली असल्याने श्रीकृष्णाचे पाय चेपायला कोणीच नाही; म्हणून साधिका त्याचे पाय चेपत आहे.

श्रीकृष्णाचे चरण घट्ट धरून ठेवणे : जन्म मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवण्यासाठी ‘हे भगवंता, तूच माझ्याकडून अकर्म कर्म करवून घे आणि सर्व कर्मबंधनांतून मला मुक्त करून कायमचे तुझ्या चरणांशी स्थान दे’, अशी प्रार्थना करून समर्पण भक्ती करणार्‍या अहंशून्य अवस्थेतील भक्ताचे दर्शन या चित्रातून घडत आहे.

गोपीभावाचा उच्च स्तर गाठणे पुष्कळ कठीण असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सनातनच्या गोपींची दास्यभक्ती करण्यास सुचवणे : बालगोपीला सेवाभावाचे बाळकडू पाजून भगवंताने तिच्यात दास्यभक्तीचा उदय केला आणि तिच्याकडून भक्तांची सेवा करवून घेतली.’

साधिकेचा उद्धार करण्या श्रीकृष्ण बालरूपामध्ये येणे : साधिका बालकभावाच्या स्थितीत अडकलेली आहे आणि या स्थितीच्या पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी ती काहीच प्रयत्न करत नाही, हे श्रीकृष्णाने जाणल्यामुळे, तोच बालरूपामध्ये येऊन तिला पुढे घेऊन जात आहे.

श्रीकृष्ण संसाराच्या भवसागरातून सर्वांना पैलतिरावर नेत असणे : ‘बालकन्हैया…’ हे मूळ तामिळ लोकगीत आठवून गीताच्या मतितार्थाची खोली त्या वेळी साधिकेला जाणवली. या गीतामध्ये श्रीकृष्ण नावाडी असून तो संसाराच्या या भवसागरातून आम्हाला पार करत असल्याचे वर्णन आहे.

भगवान श्रीकृष्णाने प्रक्रियेच्या शाळेत प्रवेश मिळवून देणे आणि ‘पू. राजेंद्रदादांकडून शाबासकी मिळवायची’, असे सांगणे : या चित्रातून श्रीकृष्णाने ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करूनच संतकृपा प्राप्त होते अन् कर्मयोगातून कृष्णाची प्राप्ती होते’, असा संदेश दिलेला आहे.’

साधिकेची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यानंतर पू. सत्यवानदादा (सनातनचे पाचवे संत पू. सत्यवान कदम) यांच्याकडून भेटवस्तू स्वीकारतांना बालकभावातील साधिकेच्या पाठीमागे एका अभिमानी पित्यासमान उभा असणारा श्रीकृष्ण दाखवला आहे.

सौ. उमा रविचंद्रन् यांनी साधनेला आरंभ करण्यापूर्वी आणि साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या स्थिती दर्शवणारे चित्र : या चित्रामध्ये अनुक्रमे पुढील ९ प्रकारचे भाव दर्शवले आहेत.


1396803048_Umakka_1_lekh5_Icon१. श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे

ईश्वर किंवा गुरु यांच्या अस्तित्वाची कोणत्याही स्वरूपातील जाणीव उत्कटतेने असणे, त्या जाणिवेच्या पोटी श्रीकृष्णासमवेत केलेल्या जीवनातील दैनंदिन कृती.

1397062426_Umakka_1_lekh3_125२. साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने दिलेल्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

स्थुलातून श्रीकृष्ण जरी काहीही करतांना दिसत नसला, तरी सूक्ष्मातून प्रत्येकात वास करून तोच सर्व कर्म करत आहे.

1397119543_Umakka_2_lekh2_125३. भगवान श्रीकृष्णाची शिकवण दर्शवणारी चित्रे

ईश्वर भक्तांसाठी सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निर्गुण स्वरूपातून मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सहज ओळखू शकणार्‍या सगुण रूपात अवतीर्ण होणे.

1397124860_Umakka_2_lekh4_125४. ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे

न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.’या वचना प्रमाणे ईश्वर विविध माध्यमातून भक्तांचे रक्षण करणे.

1397211199_Umakka_2_lekh6_125५. कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

संगणकावर सेवा करतांना, चित्र काढतांना, प्रसार करतांना, अनोळखी व्यक्तींना सामोरे जातांना, प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या कृपेने होत असणे.

1397237243_Umakka_2_lekh15_125६. सनातनमधील काही आनंददायक घटना दर्शवणारी चित्रे

सनातनच्या साधकांना दैवी कण आढळणे, साधकांना संत बनवणे यांसारख्या दिव्य उपहारांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण साधकांवर कृपेचा वर्षाव करणे.

1397240169_Umakka_2_lekh13_125७. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी चित्रे

प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात उमगलेले अवतार-रहस्य आणि श्रीकृष्णाप्रमाणे मधुराधिपती, जगन्माता, जगत्पिता असणार्‍या प.पू. डॉक्टरांची मधुर आठवण.

1418566858_P_Yoyatai_icon2८. पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

भगवान श्रीकृष्णाप्रती असलेल्या अत्युच्च भावामुळे पू. (सौ.) योया वाले यांना विविध भावचित्रे स्फुरली आहेत.