आयुर्वेद – अनादी आणि शाश्वत मानवी जीवनाचे शास्त्र
आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर व अहितकर आहार, विहार व आचार यांचे विवेचन केलेले आहे. मानवी आयुष्याचे ध्येय व खरे सुख कशात आहे याचाही विचार केलेला आहे. तसेच रोगांची कारणे, लक्षणे, उपचार व रोग होऊ नये म्हणून उपाय दिलेले आहेत. याच आयुष्यातच नव्हे, तर पुढील जन्मांतही सर्वांगीण उन्नति करून मानवी जीवनाचे अंतिम ध्येय, दुःखापासून कायमची मुक्ति व सच्चिदानंद स्वरूपाची सतत अनुभूति कसे गाठावे याचेही मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे. थोडक्यात म्हणजे मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करणारे व यशस्वी, पुण्यमय, दीर्घ, आरोग्यसंपन्न जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद.
रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोगऔषधी वनस्पतींची लागवड करा !पावसाच्या पाण्यावर लागवड करता येण्याजोग्या औषधी वनस्पतीघराच्या सज्जात लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती