यात आपण नामजप, आरती, स्तोत्र, पाळणा अन्य बरेच काही ऐकू शकता. नामजप, आरती आदी म्हणतांना शब्दांचे योग्य उच्चार, देवतेला आळवणे, आर्तभाव आदी गोष्टी अधिकारी व्यक्तींकडून शिकाव्या लागतात. सध्या धकाधकीच्या जीवनात तसे करणे शक्य नसते, त्यामुळे येथे भाव असणार्या साधकांनी, संत वा अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली म्हटलेले ऑडिओ उपलब्ध केले आहेत. यानुसार म्हणण्याचा प्रयत्न केल्याने आध्यात्मिक उन्नतीस चालना मिळेल, तसेच वातावरण सात्त्विक होण्यास साहाय्य होईल.
दत्त जयंती निमित्त दत्तरूपी गुरुतत्त्वाचे महात्म्य वर्णन करणारा विशेष भक्तीसत्संग !
दत्त जयंती म्हणजे त्रिदेवस्वरूप दत्तगुरूंचा अवतरणदिन ! शिष्याचे अज्ञान नष्ट करणे, हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. अज्ञानी जिवांना ज्ञान प्रदान करण्यासाठी भगवंतच श्रीदत्तप्रभूंच्या रूपाने योग्य वेळी प्रकट होतो आणि त्या जीवांवर कृपा करून त्यांना आत्मबोध करतो. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन:पुन्हा अवतरित होत असतात. म्हणूनच भक्तांसाठी दत्त जयंती हा केवळ श्रीदत्तगुरूंचा उत्सव नसून गुरुतत्त्वाचा उत्सव आहे. या भक्तीसत्संगाद्वारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यमय वाणीतून दत्तरूपी गुरुतत्त्व अनुभवूया.
सत्संगातील विषय :
१. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या दत्तमंत्राचा भावार्थ !
२. दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती यांच्यावरील श्रद्धेने त्यांचे आज्ञापालन केल्याने ७ दिवसांत कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या ब्राह्मणाची कथा !
३. श्रीगुरुस्तुतीचे अष्टक – ‘इंदुकोटी तेजकिरण स्तोत्राची पार्श्वभूमी आणि भावार्थ !
वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्रीविष्णुभक्तीचे माहात्म्य सांगणारा विशेष भक्तीसत्संग !
वैकुंठ चतुर्दशीचे माहात्म्य, म्हणजे या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार उघडे असते. जो जीव या दिवशी भक्तीपूर्वक श्रीविष्णूचे पूजन आणि नामस्मरण करतो, त्या जिवाला श्रीविष्णूच्या दिव्य वैकुंठधामात सुनिश्चितपणे स्थान प्राप्त होते; म्हणूनच या सत्संगातून श्रीविष्णूच्या भक्तीचे माहात्म्य जाणून घेऊन आपण त्याची आराधना करूया. आपल्या अंतरंगात श्रीविष्णूची भक्ती रुजवून त्याची कृपा संपादन करूया !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या मुखातून ऐकूया, महाविष्णूचे परम भक्त देवर्षि नारद आणि स्वयं महाविष्णु यांच्यातील दिव्य संवाद अन् त्याद्वारे श्रीविष्णूने उलगडलेले विष्णुभक्ताचे माहात्म्य !
कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीविष्णूमाहात्म्य अनुभवायला देणारा विशेष भक्तीसत्संग !
कार्तिकी एकादशीला ‘हरि प्रबोधिनी एकादशी’ अथवा ‘देवोत्थानी एकादशी’, असेही म्हटले जाते. या एकादशीला भगवान विष्णुसह सर्व देवतांची आराधना करतात. चातुर्मासातील चार मासांच्या योगनिद्रेनंतर कार्तिकी एकादशीपासून कार्यरत होणार्या भगवान श्रीविष्णूच्या तत्त्वाची अनुभूती देणारा भक्तीसत्संग श्रवण करूया !
सत्संगातील अन्य विषय :
१. कार्तिकी एकादशीचे माहात्म्य !
२. कथा : थोर संत नरहरी सोनार यांनी अनुभवलेले हरि आणि हर यांचे अद्वैत !
दीपावलीच्या निमित्ताने आंतरिक गुणदीपांच्या आध्यात्मिक दीपोत्सवाची शिकवण देणारा विशेष भक्तीसत्संग !
दीपावली हा सण आश्विन कृष्ण त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन कृष्ण चतुर्दशी (नरकचतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा (बलिप्रतिपदा), असे ४ दिवस साजरा केला जातो. ‘वसुबारस’ आणि ‘भाऊबीज (यमद्वितीया)’ हे दिवस दिवाळीला जोडून येतात; म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो.
या भक्तीसत्संगाद्वारे दीपावलीच्या अंतर्गत येणार्या प्रत्येक दिवसाचा आध्यात्मिक भावार्थ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यमय वाणीतून जाणून घेऊया. दीपावलीला बाह्य दिव्यांच्या दीपोत्सवासह आंतरिक गुणदीपांनीही आपले मनमंदिर उजळून आध्यात्मिक दीपोत्सव साजरा करूया !
सत्संगातील अन्य विषय : अलक्ष्मी हरणार्या देवी महालक्ष्मीच्या आरतीचा भावार्थ जाणून घेऊया आणि दीपोत्सवाच्या चैतन्याने मनमंदिराचा गाभारा उजळून पंचप्राणांच्या ज्योतीने देवी आईला ओवाळूया !
आदिशक्ती जगदंबेचा ‘भक्तीमय जागर’ करणारे नवरात्रीनिमित्तचे विशेष भक्तीसत्संग !
विजयादशमी
१. महिषासुराचा वध करणार्या महिषासुरमर्दिनीची कथा !
२. विजयादशमीला श्रीरामाने केलेल्या रावणवधाचा प्रसंग !
३. नवरात्र आणि सीमोल्लंघन यांचा भावार्थ !
नवरात्रीचा नववा दिवस – ‘सिद्धीदात्री’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे नववे रूप ‘सिद्धीदात्री’देवी हिचे माहात्म्य !
२. मुकांबिकादेवीचे माहात्म्य !
३. ‘गोंधळा’द्वारे देवीआईची आराधना !
नवरात्रीचा आठवा दिवस – ‘महागौरी’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे आठवे रूप ‘महागौरी’देवी हिचे माहात्म्य !
२. महासरस्वतीदेवी – सरस्वतीच्या कृपेने बुद्धी प्राप्त झालेल्या उतथ्याची कथा !
३. जोगव्याद्वारे देवीआईची आराधना !
नवरात्रीचा सातवा दिवस – ‘कालरात्री’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’देवी हिचे माहात्म्य !
२. भगवान श्रीविष्णूला मधु आणि कैटभ या दैत्यांशी युद्ध करण्यासाठी आदिशक्तीने केलेले साहाय्य !
३. आद्य शंकराचार्य रचित ‘राजराजेश्वरी स्तोत्रा’चा भावार्थ !
नवरात्रीचा सहावा दिवस – ‘कात्यायनी’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे सहावे रूप ‘कात्यायनी’देवी हिचे माहात्म्य !
२. देवीचे मानवजातीप्रती असलेले प्रीतीरूप : शाकंभरीदेवी, शताक्षीदेवी आणि अन्नपूर्णादेवी!
३. आद्य शंकराचार्य रचित ‘अन्नपूर्णा स्तोत्रा’चा भावार्थ !
नवरात्रीचा पाचवा दिवस – ‘स्कंदमाता’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’देवी हिचे माहात्म्य !
२. ललिता त्रिपुरसुंदरी देवीचे माहात्म्य !
३. आद्य शंकराचार्य रचित ‘कनकधारा स्तोत्रा’मागील कथा !
४. अष्टलक्ष्मींचा महिमा आणि अष्टलक्ष्मी स्तोत्राचा भावार्थ !
नवरात्रीचा चौथा दिवस – ‘कूष्मांडा’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे चौथे रूप ‘कूष्मांडा’देवी हिचे माहात्म्य !
२. श्रीविष्णूने केलेला ‘अंबा यज्ञ’ !
३. इंद्राने ‘महालक्ष्मी अष्टका’द्वारे केलेल्या लक्ष्मीस्तुतीचा भावार्थ !
नवरात्रीचा तिसरा दिवस – ‘चंद्रघण्टा’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे तिसरे रूप ‘चंद्रघण्टा’देवी हिचे माहात्म्य !
२. रामकृष्ण परमहंस यांनी केलेली कालीमातेची भक्ती !
३. आदिशक्तीच्या चरणकमलांच्या नखामध्ये त्रिदेवांना घडलेले ब्रह्मांडाचे दर्शन !
नवरात्रीचा दुसरा दिवस – ‘ब्रह्मचारिणी’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’देवी हिचे माहात्म्य !
२. श्रीरामाने केलेले नवरात्रीचे व्रत
३. आद्य शंकराचार्यांनी केलेली देवीची उपासना
४. आद्य शंकराचार्य रचित भवानी अष्टकाचा भावार्थ !
नवरात्रीचा पहिला दिवस – ‘शैलपुत्री’देवीचे माहात्म्य !
१. नवदुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’देवीचे माहात्म्य !
२. देवी सतीची कथा आणि ५१ शक्तीपीठे !
३. दुर्गा चालिसाचा भावार्थ !
नवरात्र म्हणजे साक्षात् आदिशक्तीस्वरूपिणी जगदंबिकेचा उत्सव ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. नवरात्रीच्या निमित्ताने देवीची आध्यात्मिक भावाच्या स्तरावर आराधना शिकण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांनी घेतलेले विशेष भक्तीसत्संग आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
नवरात्रीच्या ९ दिवसांतील प्रत्येक दिवशी देवीचे एकेक तत्त्व कार्यरत असते. तिच्या या ९ रूपांनाच ‘नवदुर्गा’, असे म्हटले आहे. त्या नवदुर्गांचा महिमा प्रत्येक दिवसाच्या भक्तीसत्संगाद्वारे अनुभवूया !
साक्षात् देवीस्वरूप असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतून हे भक्तीसत्संग श्रवण करून नवरात्रीच्या कालावधीत कार्यरत असलेल्या देवीतत्त्वाचा लाभ घेऊया !
श्री गणेशाची आगळीवेगळी आराधना करायला शिकवणारा गणेशोत्सवानिमित्तचा विशेष भक्तीसत्संग !
विघ्नहर्त्या श्री गणेशाचे पूजन सर्व युगांमध्ये होत आले आहे. श्री गणेश हा प्रथम पूजाप्राप्तीचा अधिकारी आहे. कोणतेही व्रतवैकल्य असो, पूजा-अर्चा असो, मंगलकार्य असो, समारंभ असो अथवा कोणत्याही देवतेचे पूजन असो, सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशोत्सव चालू होतो. तेव्हापासून भाद्रपद शुक्ल चतुर्दशी पर्यंत, म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत गणपति बाप्पा सर्वांना आनंद प्रदान करत असतो; म्हणूनच गणेशोत्सव हा ‘आनंदोत्सव’ आहे. ‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने विघ्नहर्त्या श्री गणेशाची आगळीवेगळी भावपूर्ण आराधना कशी करायची ?’, हे शिकण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यमय वाणीतील भक्तीसत्संग श्रवण करूया !
या सत्संगात जाणून घेऊया –
१. मधु आणि कैटभ या दैत्यांच्या संहारासाठी श्रीविष्णूने केलेली श्री गणेशाची आराधना !
२. त्रिपुरासुराच्या वधासाठी भगवान शिवाने केलेली श्री गणेशाची आराधना !
३. श्री गणेशाच्या पूजेत दूर्वा वहाण्याचे महत्त्व, तसेच दूर्वांशी संबधित करायचे भावजागृतीचे प्रयत्न !
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य जन्मलीलेचे रहस्य सांगणारा विशेष भक्तीसत्संग !
‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ म्हणजे साक्षात् लीलाधारी जगद्गुरु श्रीकृष्णाच्या अवतारधारणाचा दिव्य दिवस ! आबाल-वृद्ध सर्वांना ज्याचा लळा आहे, अशा मधुर आणि मनोहर श्रीकृष्णाच्या दिव्य लीला ऐकल्या की, जीव त्या कृष्णभक्तीतच डुंबून जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यमय वाणीतील भक्तीसत्संगातून साक्षात् भगवान श्रीकृष्णाची जन्मलीला आणि त्यामागील विविध दैवी रहस्ये जाणून घेऊन कृष्णभक्तीमय होऊया !
रक्षाबंधनाच्या निमित्ताने श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील भक्तीमय नाते उलगडणारा विशेष भक्तीसत्संग !
रक्षाबंधन हा बहीण आणि भाऊ यांच्यातील प्रीती दर्शवणारा पवित्र सण आहे.
या सणाचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केल्यास असे लक्षात येते की, ‘मायेच्या विश्वातील सर्व नात्यांच्या पलीकडे आपले भगवंताशीच जन्मोजन्मीचे नाते असते. भगवंतच आपला सखा आणि सर्वस्व असतो.’ भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातही असेच आध्यात्मिक नाते होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यमय वाणीतील भक्तीसत्संगातून आर्तता आणि दृढ भक्ती यांचे उत्कट उदाहरण असलेल्या द्रौपदीची भक्ती शिकूया अन् आपणही आपले भगवंताशी असलेले नाते दृढ करूया !
नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतांप्रती कृतज्ञताभाव वृद्धींगत करणारा विशेष भक्तीसत्संग !
श्रावण मास, म्हणजे ‘सणांचा मास’ असे या मासाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’ ! सर्व प्राणीमात्रांत परमेश्वरी तत्त्व आहे. जगातील सर्व जीवजंतू या जगताचे कार्य चालावे यासाठी पूरक आहेत, याचेच एक उदाहरण म्हणजे नाग ! भगवान श्रीकृष्णानेही गीतेमध्ये सांगितले आहे, ‘नागांमध्ये श्रेष्ठ असा अनंत मी आहे !’
नागपंचमीच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यमय वाणीतील भक्तीसत्संगातून सात्त्विक आणि दैवी नागांनी केलेली भक्ती जाणून घेऊया.
यासह या सत्संगातून जाणून घेऊया …
१. भगवान शिवाच्या कंठातील वासुकी नागासह ९ नागांची शिवभक्ती !
२. प्रत्येक युगातील शेषनागाची विष्णुभक्ती अन् त्याची तपश्चर्या !
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परब्रह्मस्वरूप गुरुदेवांचे वर्णन करणारा विशेष भक्तीसत्संग !
गुरु-शिष्याचे अतुट नाते दर्शवणारा परमदिव्य महोत्सव म्हणजे ‘गुरुपौर्णिमा’ ! परब्रह्मस्वरूप, निर्गुण, निराकार अशा गुरुतत्त्वाच्या लीलेचे वर्णन ऐकून गुरुमय होण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यदायी वाणीतून हा भक्तीसत्संग श्रवण करूया. त्याद्वारे गुरूंच्या दिव्यत्वाची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया !
या विशेष भक्तीसत्संगातून जाणून घेऊया …
१. साक्षात् परब्रह्मस्वरूप गुरूंची महती !
२. गुरूंचे सामर्थ्य आणि गुरूंच्या आज्ञापालनाचे महत्त्व दर्शवणारी समर्थ रामदास स्वामी यांची कथा !
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तवत्सल विठुमाऊलीप्रति अपार भक्ती शिकवणारा विशेष भक्तीसत्संग !
आषाढी एकादशीला अनेक विठ्ठलभक्त वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जातात. या विठ्ठलभक्तांचे भक्तीमाहात्म्य श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यदायी वाणीतून श्रवण करूया.
संत जनाबाई यांच्या सुंदर अभंगाद्वारे श्री विठ्ठल आणि भक्त यांच्यातील भक्तीमय नात्याचा परिचय जाणून घेऊन स्वत:च्या अंतरात विठ्ठलभक्ती अनुभवूया !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री गुरुमाहात्म्य उलगडणारा विशेष भक्तीसत्संग !
‘या वर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८२ वा जन्मोत्सव सप्तर्षींच्या आज्ञेनुसार २७ ते ३०.५.२०२४ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री गुरूंप्रती अंतरात कृतज्ञतेचा भाव जागृत होण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या गुरुभक्तीमय वाणीतून गुरुमाहात्म्य उलगडणारा हा भक्तीसत्संग श्रवण करूया. या भक्तीसत्संगाद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे माहात्म्य जाणून घेऊन त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या श्री चरणी श्री गुरुस्तुतीरूपी भक्तीनमन पुष्प समर्पित करूया !
या विशेष भक्तीसत्संगात जाणून घेऊया
१. प्रत्येक जिवाला त्याच्या भावानुसार अनुभूती देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
२. कथा : वामन पंडितांमधील विद्वत्तेचा अहंकार नष्ट करून त्यांची आत्मजागृती करणारे समर्थ रामदासस्वामी !
३. समर्थ रामदास स्वामी यांच्याप्रमाणे अखिल मानवजातीला साधना शिकवून त्यांना उद्धाराचा मार्ग दाखवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
४. विविध माध्यमांतून साधकांना घडवणार्या आणि त्यांचा उद्धार करणार्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित भक्तीनमन !
हनुमंताच्या भक्तीचे माहात्म्य सांगणारा हनुमान जयंतीनिमित्तचा विशेष भक्तीसत्संग !
श्रीविष्णूने श्रीरामाच्या रूपात पृथ्वीतलावर दिव्य अवतार धारण केला. त्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी रामकार्यात सहयोग देण्यासाठी भगवान शंकराने हनुमंताच्या रूपात अवतार घेतला. हनुमानाच्या तन-मनाच्या कणाकणात प्रभु श्रीराम असून त्याचे आचरण राममय आहे. रामभक्ती हाच त्याचा मंत्र आणि रामसेवा हाच त्याचा ध्यास आहे. अशा हनुमंताची परम भक्ती शिकण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यदायी वाणीतील हा भक्तीसत्संग श्रवण करूया.
या सत्संगात जाणून घेऊया…
१. हनुमंताचे दिव्य अवतारधारण !
२. अंजनीसारख्या वीरमातेच्या पोटी जन्मलेला तेजस्वी पुत्र हनुमान !
३. श्रीरामाने केलेली हनुमंताची स्तुती !
४. हनुमंताची दास्यभक्ती सांगणारे काही प्रसंग !
भक्तीसत्संग (रामनवमी विशेष)
२२.१.२०२४ या दिवशी साक्षात् श्रीरामलल्ला मूर्तीरूपाने अयोध्येत विराजमान झाला आहे. त्यामुळे यावर्षीचा रामनवमीचा उत्सव समस्त रामभक्तांसाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या अंतरात ‘श्रीरामलल्लाविषयीची भक्ती वाढून त्याच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घेता यावा’, यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या चैतन्यदायी वाणीतील हा भक्तीसत्संग श्रवण करूया आणि त्याद्वारे श्रीरामप्रभूच्या दिव्य लीलांची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया.
या विशेष भक्तीसत्संगात श्रीरामाच्या अवतारी बाललीला जाणून घेऊया ! : त्रेतायुगात श्रीरामजन्मामुळे अयोध्येसह सर्वत्रचे वातावरणच पालटले. ‘आपल्या गोंडस आणि लडिवाळ रूपाने, बालसुलभ लीलांनी अन् मधुर बोबड्या बोलांनी श्रीरामाने माता कौसल्या, पिता राजा दशरथ, महालातील सेवेकरी, संपूर्ण महाल आणि सारी अयोध्यानगरी या सार्यांना मंत्रमुग्ध करणे, एकाच वेळी दोन रूपे घेऊन माता कौसल्येला भुलवणे, मातेला विराट रूपात दर्शन देणे’, अशा रामलीलांचे सुंदर वर्णन ऐकून त्याच्या अवतारत्वाची प्रचीती घेऊया.
भक्तीसत्संग (महाशिवरात्री विशेष)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यदायी वाणीतील महाशिवरात्री निमित्तच्या विशेष भक्तीसत्संगाचे भावपूर्ण श्रवण करूया. आपल्या अंतरातील शिवभक्ती वृद्धींगत होण्यासाठी जगद़्पिता भगवान शिवाचा महिमा जाणून घेऊया । या सत्संगात ऐका, १२ ज्योतिर्लिंगांचे दिव्य माहात्म्य आणि भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी आदिशक्ति पार्वतीने केलेली कठोर तपस्या.
श्री गणेश ॥ ॐ गँ गणपतये नमः ॥
श्री गणेश ॥ श्री गणेशाय नमः ॥
श्री गुरुदेव दत्त (तारक) ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त (मारक) ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त ॥ ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॥
भगवान शिव ॥ ॐ नम: शिवाय ॥
श्री राम ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
श्री हनुमान ॥ श्री हनुमते नमः ॥
श्रीकृष्ण ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
कुलदेवता ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥
श्री दुर्गादेवी ॥ श्री दुर्गादेव्यै नमः ॥
श्री अंबादेवी ॥ श्री अंबादेव्यै नमः ॥
श्री भवानीदेवी ॥ श्री भवानीदेव्यै नमः ॥
श्री रेणुकादेवी ॥ श्री रेणुकादेव्यै नमः ॥
श्री महालक्ष्मीदेवी ॥ श्री महालक्ष्मीदेव्यै नमः ॥
श्री सप्तशृंगीदेवी ॥ श्री सप्तशृंगीदेव्यै नमः ॥
श्री योगेश्वरीदेवी ॥ श्री योगेश्वरीदेव्यै नमः ॥
ओमिक्रॉन विषाणूपासून रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर बळ मिळावे यासाठी नामजप
श्री गणपति
श्री गुरूदेव दत्त
श्रीराम
श्री विठ्ठल
भगवान शिव
श्री हनुमान
श्रीकृष्ण
श्री दुर्गादेवी
श्रीगुरु
मंत्र पुष्पांजली
श्री गणपति अर्थवशीर्ष
राम रक्षा स्तोत्र
श्री मारूती स्तोत्र
श्री गणेश स्तोत्र
श्री आदित्यहृद्य स्तोत्र
श्री बगलादिगबंधन स्तोत्र
श्री सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र
देवी कवच
श्रीकृष्णाष्टकम्
‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र (1)
‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र (2)
‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र (3)
ॐ (तारक)
ॐ (मारक)
ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ
शून्य
महाशून्य
निर्गुण
निर्विचार ॥ निर्विचार ॥
श्री निर्विचाराय नमः ॥ श्री निर्विचाराय नमः ॥
ॐ निर्विचार ॐ निर्विचार
श्रीकृष्णाचा पाळणा
श्रीरामाचा पाळणा
आदी शक्ती तू अंत शक्ती तू…
सनातन धर्म सूर्य उगवला…
याविषयी अधिक माहिती येथे वाचा… सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने
देहा रंगी रे मना रंगी रे…
आनंद-कंद दाता नांदे या हृदयी माझ्या…
बाप माझा हो ज्ञानवंत…
चला जाऊ नाथ सदनाला, साई सदनाला…
प्रशांत चंद्र हा…
‘जय रघुनंदन जय सीयाराम’ची नामधून
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या चैतन्यमय नामधून
याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे click करा ! … चैतन्यमय नामधून
प्रस्तावना
राम कृष्ण हरि
राधा राधाकृष्ण राधा
राधा राधाकृष्ण राधा, हरि ॐ तत्सत् ।
विठ्ठल विठ्ठल
ज्ञानेश्वर माऊली एकनाथ नामदेव तुकाराम
पावना दत्ता पतितपावना दत्ता
हरि ॐ तत्सत् ।
सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेली भावगीते आध्यात्मिक उपायांसाठी उपयुक्त !
याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे click करा ! … सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेली भावगीते
आनंद कंद दाता
जय जय महाराष्ट्र
कान्हा तु खोड्या करु नको
नको देवराया
या जन्मावर, या जगण्यावर
दर्शन दे रे
वंदुया निखिल ब्रम्ह अवधुता
देहा रंगी रे
ओंकार
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनाविषयक प्रवचन
परात्पर गुरु डाॅ. आठवले यांनी साधकांना केलेले साधनेसंदर्भातील मार्गदर्शन
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनाविषयक प्रवचन
परात्पर गुरु डाॅ. आठवले यांनी साधकांच्या शंकांचे केलेले निरसन (ऑडिओ)
मानस सर्व देहशुद्धी
ईश्वरी चैतन्याने सर्व देह चैतन्यमय करण्यासाठी पू. राजेंद्र शिंदे यांनी दिलेली एक अभिनव उपायपद्धत !
याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे click करा ! … मानस सर्व देहशुद्धी
आध्यात्मिक उपाय, तसेच साधनावृद्धी आणि भाववृद्धी यांसाठी प्राप्त झालेले दैवी (सात्त्विक) नाद !
भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आणि प.पू. डॉक्टरांच्या आशीर्वादाने रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आणि देवद आश्रमात विविध माध्यमांतून प्राप्त झालेले दैवी नाद, तसेच त्यांची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दैवी नादांच्या उपयोगाने आपल्या साधनेला गती मिळणार असून, यातील काही नाद भावजागृतीसाठी, तसेच काही नाद आध्यात्मिक उपायांसाठीही उपयुक्त आहेत.
नाद ऐकण्यासाठी तसेच याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे click करा ! … दैवी (सात्त्विक) नाद
टीप : येथे दिलेल्या कोणत्याही एका ऑडिओ वर क्लिक केल्यावर तो सुरु होईल आणि पुन्हा पुन्हा Play होत राहील. मोबाईल वर ऐकणाऱ्यांनी स्क्रीन लॉक जर केले तरी ऑडिओ थांबणार नाही, त्यामुळे स्क्रीन सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही.