ईश्‍वरप्राप्तीसाठी कला – चौसष्ट कला

‘साधनेच्या संदर्भात ‘व्यक्ती तितक्या तितके साधनामार्ग’, असा सिद्धात आहे. यालाच अनुसरून आपल्याकडे निवृत्तीमार्ग आणि प्रवृत्तीमार्ग असे साधनामार्गाचे दोन मुख्य आहेत. निवृत्ती मार्गियांसाठी १४ विद्या, तर प्रवृत्ती मार्गियांसाठी ६४ कला हे साधनामार्ग सांगितलेले आहेत. कलांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील गरजा भागवता येतात आणि सात्त्विक कलेमुळे समाज हळूहळू सात्त्विकतेकडे वळण्यास साहाय्य होते.’ ‘१४ विद्या निर्गुणाकडे, तर ६४ कला सात्त्विकतेकडे जायला शिकवतात.’ अवश्य वाचा …  कलेसाठी कला नव्हे, तर ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’

६४ कलांचे महत्त्व

या कलांचा संबंध ज्ञानाशी आणि व्यवहाराशी आहे. त्यातून व्यक्तिमत्त्व विकास होतो, तसेच या कला जीवनासाठीही उपयुक्त आहेत.

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ साधनामार्ग

कलाकार जीव ज्या वेळी जन्माला येतो, त्या वेळी तो इतर जिवांपेक्षा ईश्‍वराकडून काहीतरी जास्त घेऊन जन्माला आलेला असतो. एखादी कला अवगत होणे, हे ईश्‍वरी कृपेविना अशक्यच असते. या ईश्‍वरी वरदानाचा उपयोग जर कलाकाराने ईश्‍वरप्राप्तीसाठी केला, तरच खर्‍या अर्थाने कलाकाराच्या मनुष्यजन्माचे सार्थक होते. नेमके हेच आपल्याला सनातन संस्था शिकवते. केवळ लोकेषणासाठी आपल्या कलेचा उपयोग करणे, म्हणजे मनुष्य जन्माच्या मूळ उद्देशापासून दूर जाण्यासारखे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष १९९८ पासून ‘चित्रकला’, वर्ष २००१ पासून ‘संगीतकला’ या कलांच्या माध्यमातून साधक साधना करत आहेत. वर्ष २००२ – २००३ मध्ये ‘मूर्तीकला’ आणि वर्ष २००३ मध्ये ‘नृत्यकला’ या कलांच्या माध्यमातून साधकांनी साधना चालू केली. अवश्य वाचा … कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्यासाठी संशोधन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

विषयाचे अध्यात्मीकरण करणे

‘ईश्‍वर हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असल्याने क्षणोक्षणी ईश्‍वर दिशेने वाटचाल होण्यासाठी गोष्टीचे अध्यात्मीकरण करण्यावर भर दिला जातो.

कलेचा अभ्यास करण्यासह स्वतःतही सात्त्विकता वाढवणे

आधुनिक कलाकारांच्या दृष्टीने ‘कला म्हणजे निवळ कलेसाठी कला’; परंतु हिंदु तत्त्वज्ञानानुसार ‘ज्या कलेमुळे साधकत्व विकसित होते, तीच खरी कला’, असे म्हटले आहे. ‘कोणतीही कला ईश्‍वर असली पाहिजे’, असे हिंदु धर्म सांगतो. कलावंत एखाद्या वस्तूच्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचा आविष्कार करतो, त्या वेळी सौंदर्यासह सात्त्विकताही निर्माण होते. चित्रकला, मूर्तीकला, शिल्पकला, नाट्यकला, पाककला अशा कोणत्याही कलाक्षेत्रातील साधक हा कलेकडे केवळ सौंदर्याच्या दृष्टीने पहाणारा नसेल, तर तो कलेमध्ये आणि स्वतःमध्ये सात्त्विकताही निर्माण करील.

६४ कला कोणत्या ?

१. गीत (गायन) ११. उदकवाद्य (जलतरंगासारखी वाद्ये बनवणे किंवा वाजवणे) २१. कौचुमारयोग (बळ आणि वीर्य वाढवणारी औषधे बनवणे) ३१. पुस्तकवाचन (सुयोग्यपणे पुस्तक वाचणे) ४१. वृक्षायुर्वेदयोग ( प्रत्येक वृक्ष, वनस्पती यांच्या उपयोगाचे ज्ञान) ५१. धारणमातृका (सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे) ६१. बालक्रीडनक (लहान मुलांची खेळणी बनवणे)
२. वाद्य (वाद्यांची निर्मिती आणि त्यांचे वादन) १२. उदकाघात (दुसर्‍यांवर हाताने किंवा पिचकारीने पाणी मारणे) २२. हस्तलाघव (हातांनी सहजपणे काम करणे) ३२. नाटकाख्यायिका दर्शन (इतिहासावर आधारित नाटक बसवणे) ४२. मेषकुक्कुटलावक युद्धविधी (बकरे, काेंबडे, लावा पक्षी यांच्या झुंजी लावणे) ५२. संपाठ्य (स्पर्धा किंवा मनोरंजन यांसाठी काव्य पाठ करणे) ६२. वैनयिकी विद्याज्ञान (विनय आणि शिष्टाचार यांचे ज्ञान असणे)
३. नृत्य (नाचणे) १३. चित्रयोग (वनस्पतींपासून शत्रूची हानी करण्यासाठी वस्तू बनवणे) २३. विचित्र शाकयूषभक्ष्य विकारक्रिया (विविध भाज्या व पक्वान्ने बनवणे) ३३. काव्यसमस्यापूरण (दुसर्‍याने दिलेला अपूर्ण श्‍लोक पूर्ण करणे) ४३. शुकसारिका प्रलापन (पोपट, मैना इत्यादींना बोलण्यास शिकवणे) ५३. मानसी काव्यक्रिया (न बोलता मनातल्या मनात काव्ये रचणे) ६३. वैजयिकी विद्याज्ञान (शस्त्रविद्येचे ज्ञान असणे)
४. आलेख्य (चित्र काढणे) १४. माल्यग्रथन विकल्प (फुलांचे हार, तुरे, गजरे इत्यादी बनवणे) २४. पानकरस रागासव योजन (नाना पेये आणि मद्ये बनवणे) ३४. पट्टिकावानवेत्र विकल्प (वेताच्या वस्तू बनवणे) ४४. उत्सादन, संवाहन, केशमर्दन कौशल्य (हातापायांनी शरीर दाबणे, केसांचे
मर्दन करणे आणि त्यांचा मळ दूर करणे)
५४. अभिधानकोश (शब्दांचे सखोल ज्ञान असणे) ६४. व्यायामिकी विद्याज्ञान (व्यायामाविषयी ज्ञान असणे)
५. विशेषकच्छेद्य (विविध प्रकारे टिळा लावणे आणि त्यांचे साचे बनवणे ) १५. शेखरकापीड योजन (मुकुट इत्यादी सुशोभित करणे) २५. सूचीवान कर्म (शिवणकाम) ३५. तक्षकर्म (लाकूड, धातू इत्यादींना विविध आकारांत कापणे) ४५. अक्षरमुष्टिका कथन (केवळ जाणकाराला समजेल अशा अक्षरांची
योजना करणे, मुठींनी खुणावून बोलणे)
५५. छन्दोज्ञान (गाण्याच्या अनेक चालींचे ज्ञान असणे)
६. तण्डुलकुसुमबलि विकार (देवपूजा इत्यादींच्या वेळी तांदूळ आणि फुले
यांच्या सुंदर रचना करणे)
१६. नेपथ्य प्रयोग (शरीर वस्त्र, अलंकार, पुष्पे इत्यादींनी सुशोभित करणे) २६. सूत्रक्रीडा (बाहुल्या नाचवणे, भोवरे फिरवणे इत्यादी) ३६. तक्षण (सुतारकाम) ४६. म्लेच्छित विकल्प (जाणकारालाच समजेल, असे सांकेतिक लिहिणे) ५६. क्रियाकल्प (काव्यालंकारांचे ज्ञान असणे)
७. पुष्पास्तरण (फुलांची रचना करणे) १७. कर्णपत्रभंग (शंख, हस्तीदंत इत्यादींची कर्णाभूषणे बनवणे) २७. वीणा डमरुक वाद्य (वीणा, डमरू इत्यादी वाजवणे) ३७. वास्तूविद्या (घर बांधणे) ४७. देशभाषा विज्ञान (विविध देशांच्या भाषा जाणणे) ५७. छलितकयोग (रूप आणि बोली लपवणे)
८. दशनवसनांगराग (दात, कपडे आणि अंग रंगवणे) १८. गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) २८. प्रहेलिका (कोडी सोडवणे) ३८. रूप्यरत्नपरीक्षा (रुपे आणि रत्ने यांची परीक्षा करणे) ४८. पुष्पशकटिका (फुलांनी रथ सजवणे) ५८. वस्त्रगोपन (वस्त्रांनी शरीर यथायोग्य झाकणे)
९. मणिभूमिकाकर्म (घरातील लादीवर मणी जडवणे) १९. भूषणयोजन (सुवर्णादिकांचे अलंकार धारण करणे) २९. प्रतिमाला (भेंड्या लावणे) ३९. धातुवाद (अशोधित धातू शुद्ध करणे) ४९. निमित्तज्ञान (शकून अपशकून जाणणे) ५९. द्यूतविशेष (फासे खेळणे)
१०. शयनरचन (शय्या रचणे) २०. ऐन्द्रजाल (मनोरंजनासाठी जादूचे खेळ करणे) ३०. दुर्वाचकयोग (अर्थ आणि उच्चार दोन्ही कठीण असलेले श्‍लोक म्हणणे) ४०. मणिरागाकर ज्ञान (रत्नांना रंग देणे अन् खाणी कोठे सापडतील ते सांगणे) ५०. यंत्रमातृका (यंत्रे बनवणे) ६०. आकर्षक्रीडा (मल्लयुद्ध)

कलेच्या माध्यमातून होणारे विडंबन रोखण्यासाठी कटीबद्ध व्हा !

कला म्हणजे नेमके काय ? कला हा ईश्वरी, दैवी गुण आहे. तो एक साधनेचा मार्ग आहे; परंतु आज परिस्थिती संपूर्णपणे पालटलेली आहे. आज जो येतो, तो हिंदु धर्मातील देवतांची हवी तशी विटंबना करतो आणि त्याला नाव देतो ‘कलेचे स्वातंत्र्य.’

सध्या होत असलेले चित्रकलेच्या माध्यमातून होणारे विडंबन, नाटकांच्या माध्यमातून होणारे विडंबन, विज्ञापने आणि उत्पादने यांच्या माध्यमातून होणारे विडंबन रोखण्यासाठी कटीबद्ध व्हा ! धर्मविषयक कर्तव्य बजावणे म्हणजे जसे धर्मपालन, तसे देव आणि धर्म यांची विटंबना थांबविणे, हेदेखील धर्मपालनच होय. आपण जर धर्माचे रक्षण केले, तर धर्म (ईश्वर) आपले रक्षण करील.

यासाठी अवश्य वाचा … कलास्वातंत्र्याच्या नावाखाली देवतांची विटंबना करणारे धर्मविरोधक !

संगीत (गीत/गायन)
वाद्य
नृत्यकला
आलेख्य (चित्र काढणे)

विशेषकच्छेद्य (विविध प्रकारे
टिळा लावणे आणि त्यांचे साचे बनवणे)
तण्डुलकुसुमबलि विकार (देवपूजेच्या वेळी तांदूळ आणि फुले यांच्या सुंदर रचना करणे)
गन्धयुक्ती
(सुवासिक पदार्थ बनवणे)
भूषणयोजन (सुवर्णादिकांचे
अलंकार धारण करणे)

प्रहेलिका (कोडी सोडवणे)
वास्तूशास्त्र (वास्तूविद्या)
वृक्षायुर्वेदयोग
वस्त्रगोपन (वस्त्रांनी शरीर यथायोग्य झाकणे)

सात्त्विक रांगोळ्या
मूर्ती कला
सूक्ष्म चित्रकला