श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सनातन संस्थेकडून ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

सातारा येथील सनातनची साधिका कु. राधा कोल्हापुरे हिला आंतरशालेय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त !

ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच मी हे यश मिळवू शकले’, असे सांगत तिने यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजन यांना दिले आहे.

गोवा राज्यात सनातन संस्थेचे जाहीर साधना प्रवचन

सनातन संस्थे द्वारा आनंदी जीवनासाठी साधना या विषयावर जाहीर साधना प्रवचनाचे गोव्यात म्हपसा (6.01.2024) आणि वाळपई (7.01.2024) येथे आयोजन !

कोचि (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंती निमित्त प्रवचन पार पडले !

कोचि (केरळ) – येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्त जयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला.

दत्त जयंती २०२३ निमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे येथे विविध ठिकाणी लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच विविध प्रतिष्ठितांची भेट !

फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला.

अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘मला उच्च रक्तदाबाचा थोडासा त्रास आहे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक होते. त्यांनी ‘प्रवासात मला काही त्रास झाल्यास वैद्यकीय साहाय्य मिळावे’, यासाठी आधुनिक वैद्या असलेल्या एका साधिकेला माझ्या समवेत पाठवले होते. परम दयाळू गुरूंनी ही सोय केल्यामुळे मी अमरावती येथे सकाळी ६ वाजता पोचू शकलो.

द‌त्त जयंती निमित्त सातारा, वाई, कराड, कोरेगाव येथे सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्म प्रसार !

१. श्री दत्त मंदिर, पळशी, कोरेगाव, सातारा कार्यवाहक श्री पिसाळ महाराज
२. कोरेगाव येथे आमदार श्री. महेश शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ. प्रिया महेश शिंदे यांची प्रदर्शनाला भेट