भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ; सनातन संस्था सहभागी !

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’ नावाची आध्यात्मिक संस्था ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन करत आहे. हा महोत्सव १४ ते १७ मार्च या ४ दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ‘कान्हा शांति वनम्’ नावाच्या ध्यानधारणेसाठीच्या जगातील सर्वांत मोठ्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात सनातन संस्था सहभागी होणार आहे.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

ज्ञानयोगी पू. अनंत बाळाजी आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या मराठी लघुग्रंथाचे लोकार्पण !

हा ग्रंथ वाचतांना मला प्रत्येक वाक्यातून विषय समजत होता आणि आनंद होत होता. या ग्रंथाचे वाचन करतांना वाचकांना आनंद होईल आणि विषय कळेल. अध्यात्मातील इतर ग्रंथ वाचतांना विषय समजण्यासाठी मन एकाग्र करावे लागते. अध्यात्मातील विविध विषय इतक्या सोप्या भाषेत मांडणारा हा ग्रंथ कल्पनातीत आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !

पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !

विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख अन् प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत रायपत यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख आणि रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत अन् त्यांचे सहकारी यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्याचे प्रांत सहमंत्री श्री. मनोज पोतदार आणि श्री. रंगनाथ मेहतो हेही श्री. रायपत यांच्या समवेत होते.

राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !

सनातन संस्थेच्या वतीने येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले, तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

ज्या कुळात आपला जन्म झाला आहे, त्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. ती आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता आहे. आपली साधना वाढल्यावर आपल्याला जीवनात सद्गुरु भेटतील. नामस्मरण केल्यास जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

विहिंपचे कोकण सहमंत्री अनिरुद्ध भावे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

विश्व हिंदु परिषदेचे कोकण सहमंत्री श्री. अनिरुद्ध भावे यांनी ३ मार्च या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. अयोध्येत श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा (श्रीरामाचे बालकरूप) मंगलमय प्रसाद देण्यासाठी ते आश्रमात आले होते.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे शिवजयंतीच्या उत्सवात सनातन संस्थेचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘विश्व सनातन सेने’चे तिरहुत विभागाचे श्री. अनिल कुमार यांनी शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. या उत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !