कंबोडिया बौद्ध राष्ट्र असूनही तेथील राजा नरोदोम सिंहमोनी यांच्या राजवाड्यात सर्व चिन्ह ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित असणे !
राजवाड्याचे वैशिष्ट्य असे आहे की, हा राजवाडा चीन आणि फ्रेंच वास्तूशैलीनुसार बांधला आहे; पण राजवाड्यातील सर्व चिन्हे ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित आहेत. राजवाड्याच्या परिसरात प्रवेश करतांना श्रीविष्णु आणि शिव एकत्र असलेल्या ‘हरिहर’ मूर्ती दिसतात.