मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु धर्माचा प्रसार होणे आवश्यक !

हिंदु आणि त्यांच्या परंपरांवर अत्यंत विखारी असे आक्रमण भारतीय आणि पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून हिंदु नावाच्या व्यक्तींमार्फत सातत्याने चालूच आहे.

थायलंडची राजधानी बँकॉक मधील राजमहालाची वैशिष्ट्ये !

राम १ या राजाने बँकॉक शहरात राजवाडा बांधल्यावर या राजवाड्याच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची सुंदर चित्रे रंगवून घेतली आहेत. चित्रांमधील राम, लक्ष्मण इत्यादी व्यक्तीरेखांचे तोंडवळे आणि सर्वांचे पोषाख थायलंडमधील पद्धतीनुसार आहेत.

दत्त

दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.

धुळे, मुंबई आणि पुणे येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्य आणि चैतन्य यांचा आविष्कार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत २० मे या दिवशी धुळे, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलतांना साधनेविषयीची सूत्रे ऐकून सिंगापूरसारख्या महागड्या देशातील टॅक्सीचालकाने निवासाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे पैसे न घेणे

एका ठिकाणची सेवा संपवून आम्ही ज्या ठिकाणी रहाणार होतो, त्या हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी बोलावली. त्या टॅक्सीचा चालक बौद्ध होता. त्याच्या बोलण्यातून कळले की, तो शुद्ध शाकाहारी आहे.

सनातन संस्था ही धर्मजागृती करण्याचे अतिशय चांगले कार्य करत आहे !

सनातन संस्थेचे साधक अतिशय मधुरभाषिक असतात. ते न्यूनतम आवश्यकतांमध्ये जगतात आणि राष्ट्र अन् धर्म यांचे अधिकाधिक कार्य करण्याची कामना करतात. कठीण प्रसंगातही स्वत:चे निरीक्षण करणे, ही अतिशय आश्‍चर्याची गोष्ट मी त्यांच्यात पाहिली आहे.

बोईसर आणि कोपरखैरणे येथे मंदिरांची स्वच्छता !

बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्‍वस्तांनी मंदिरात साकडे घालण्यासाठी अनुमती दिली. कोपरखैरणे येथील श्री चिकानेश्‍वर शिव मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली.

हिंदु देवतांची चित्रे असलेली विदेशातील पोस्टाची तिकिटे, पोस्टकार्ड आणि चलनातील नोटा !

श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया या देशांंमध्ये आजही आपल्याला रामायणाशी संबंधित, हिंदु देवतांवर आधारित चित्रे असलेली पोस्टाची तिकिटे, पोस्टकार्ड पहाण्यास मिळतात.

मलेशियातील बटू गुहेत असलेले कार्तिकेयाचे विश्‍वप्रसिद्ध जागृत मंदिर !

प्राचीन काळी ज्याला ‘मलय द्वीप’ म्हटले जात होते, तो म्हणजे आताचा मलेशिया देश. मलेशिया हा अनेक द्विपांचा समुच्चय आहे. मलय भाषेत अनेक संस्कृत शब्दांचा उपयोग केला जातो. मलय साहित्यात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचा संबंध दिसून येतो.

थायलंडची प्राचीन नगरी – अयुद्धया !

प्राचीन काळी ज्याला ‘श्याम देश’ म्हटले गेले, तो भूभाग म्हणजे आताचा थायलंड देश. या भूभागावर आतापर्यंत अनेक हिंदू आणि बौद्ध राजांनी राज्य केले. येथील संस्कृती हिंदु धर्मावर आधारित होती.