धुळे, मुंबई आणि पुणे येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्य आणि चैतन्य यांचा आविष्कार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत २० मे या दिवशी धुळे, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलतांना साधनेविषयीची सूत्रे ऐकून सिंगापूरसारख्या महागड्या देशातील टॅक्सीचालकाने निवासाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे पैसे न घेणे

एका ठिकाणची सेवा संपवून आम्ही ज्या ठिकाणी रहाणार होतो, त्या हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी बोलावली. त्या टॅक्सीचा चालक बौद्ध होता. त्याच्या बोलण्यातून कळले की, तो शुद्ध शाकाहारी आहे.

सनातन संस्था ही धर्मजागृती करण्याचे अतिशय चांगले कार्य करत आहे !

सनातन संस्थेचे साधक अतिशय मधुरभाषिक असतात. ते न्यूनतम आवश्यकतांमध्ये जगतात आणि राष्ट्र अन् धर्म यांचे अधिकाधिक कार्य करण्याची कामना करतात. कठीण प्रसंगातही स्वत:चे निरीक्षण करणे, ही अतिशय आश्‍चर्याची गोष्ट मी त्यांच्यात पाहिली आहे.

बोईसर आणि कोपरखैरणे येथे मंदिरांची स्वच्छता !

बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्‍वस्तांनी मंदिरात साकडे घालण्यासाठी अनुमती दिली. कोपरखैरणे येथील श्री चिकानेश्‍वर शिव मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली.

हिंदु देवतांची चित्रे असलेली विदेशातील पोस्टाची तिकिटे, पोस्टकार्ड आणि चलनातील नोटा !

श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया या देशांंमध्ये आजही आपल्याला रामायणाशी संबंधित, हिंदु देवतांवर आधारित चित्रे असलेली पोस्टाची तिकिटे, पोस्टकार्ड पहाण्यास मिळतात.

मलेशियातील बटू गुहेत असलेले कार्तिकेयाचे विश्‍वप्रसिद्ध जागृत मंदिर !

प्राचीन काळी ज्याला ‘मलय द्वीप’ म्हटले जात होते, तो म्हणजे आताचा मलेशिया देश. मलेशिया हा अनेक द्विपांचा समुच्चय आहे. मलय भाषेत अनेक संस्कृत शब्दांचा उपयोग केला जातो. मलय साहित्यात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचा संबंध दिसून येतो.

थायलंडची प्राचीन नगरी – अयुद्धया !

प्राचीन काळी ज्याला ‘श्याम देश’ म्हटले गेले, तो भूभाग म्हणजे आताचा थायलंड देश. या भूभागावर आतापर्यंत अनेक हिंदू आणि बौद्ध राजांनी राज्य केले. येथील संस्कृती हिंदु धर्मावर आधारित होती.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने होत असलेली अध्यात्म आणि सनातन संस्कृती यांची विश्‍वव्यापी ओळख !

सनातन संस्थे’चे संस्थापक आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रेरणास्थान असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अध्यात्मातील उच्चतम स्तरावर असूनही त्यांच्यात अद्वितीय अशी जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ आहे.

इंडोनेशियातील जावा द्विपावरील प्रंबनन मंदिरातील ‘रामायण’ नृत्यनाट्य !

आजच्या घडीला ९५ टक्के मुसलमान असलेल्या इंडोनेशियात ४०० वर्षांपूर्वी सर्वच जण हिंदु होते’, याला इंडोनेशियातील अनेक लोक पाठिंबा देतात.

कुठे मानसिक स्तरावर देवतांना टोपण नावे देऊन त्यांची विटंबना करणारे सध्याचे जन्महिंदू, तर कुठे देवालयांसह माणसांनाही देवतांची नावे देऊन सतत ईश्‍वरी अनुसंधान साधणारे हिंदूंचे पूर्वज !

देवतेच्या अनेक नामांपैकी केवळ एकाच नामावर आपले मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र करून त्याचे स्मरण केल्याने अनुसंधान साधता येते. हे साध्य करण्यासाठी पूर्वीच्या काळी मुलांना ‘केशव, माधव, पांडुरंग, राधा, सीता, गौरी’, अशी देवतांची नावे ठेवली जात आणि त्याच नावाने त्यांना हाक मारली जात असे.