महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाचा नामजप, तसेच धर्माचरण करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या ! – सौ. आशा साठे, सनातन संस्था

महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व १ सहस्र पटीने कार्यरत असते, तरी या दिवशी शिवाचा नामजप करणे, तसेच धर्माचरण करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. आशा साठे यांनी केले.

मुंबई आणि नवी मुंबई येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ४१ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमांतून अध्यात्मप्रसार !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई येथे एकूण ४१ ठिकाणी शिवमंदिरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला.

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात आणि कर्नाटक येथे ३४ ठिकाणी विविध शहरांत, ग्रामीण पातळीवर ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांचा सक्रीय सहभाग होता, प्रत्येक प्रदर्शनस्थळी मान्यवरांनी भेटी दिल्या.

कर्नाटकमधील पेजावर मठाचे अध्यक्ष स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घेतली भेट !

या प्रसंगी स्वामीजींना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी त्यांनी ‘मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे’, असे सांगत साधकांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.

सनातनच्या सांगली येथील हितचिंतक सौ. मिनाक्षी जोग यांच्याकडून पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयास सनातन संस्थेच्या सुसंस्कार मालिकेचे ग्रंथ भेट !

हे ग्रंथ कु. चैतन्य अभिजीत जोगळेकर (वय ११ वर्षे) याच्याकडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी स्वीकारले.

शरिरात उष्णता वाढल्यास त्यावर शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर करायचे विविध उपाय !

पोटातून औषध घेण्याचे वरील आयुर्वेदीय उपचार अधिकाधिक १५ दिवस करून पहावेत. हे उपचार केल्यावरही त्रास न्यून होत नसेल, तर स्थानिक वैद्यांचा समादेश घ्यावा.

पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

भाजपचे पुणे येथील आमदार श्री. सुनील कांबळे यांनी १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघमेळ्यामध्ये शास्त्र धर्म प्रचार सभेचे अनुयायी आणि सनातन संस्था यांचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची झाली भावस्पर्शी भेट !

नुकताच पार पडलेल्या माघमेळ्यात बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना शास्त्र धर्म प्रचार सभेच्या आश्रमाला सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी भेट दिली.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला आसाम आणि महाराष्ट्र येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

या लेखात सनातन ग्रंथसंपदेविषयी विविध मान्यवरांनी दिलेले अभिप्राय आणि ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला प्रसिद्धी माध्यमांचा सक्रीय सहभाग आणि प्रतिसाद पाहूया. तसेच आसाम येथे मिळालेला प्रतिसादही पाहूया.

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यापेक्षा लहान वयात स्वराज्याची शपथ घेणार्‍या छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

 भारतात बहुसंख्य हिंदू आहेत; मात्र ते पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे कोट्यवधी भारतियांमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत १ दिवसच नव्हे; तर वर्षभरातील