इंदूर येथे प.पू. रामानंद महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ‘श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज’ या सनातनच्या ग्रंथाचे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन !

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने १२ आणि १३ मार्च या दिवशी प.पू. रामानंद महाराज यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

आनंदी आणि श्रीविठ्ठलाविषयी भोळाभाव असणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आनंदी, हसतमुख आणि भोळ्या भावाने श्रीविठ्ठलभक्तीत रममाण झालेले ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले.

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील राज्यांमध्ये आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील राज्यांमध्ये प्रवचन, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे, तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना जिज्ञासूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, फलक प्रदर्शन आणि व्याख्याने यांद्वारे करण्यात आलेला व्यापक धर्मप्रसार !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात, तसेच पिंपरी-चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ व्याख्यान यांच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्यात आला.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ग्रंथप्रदर्शन अन् विविध माध्यमांतून करण्यात आला धर्मप्रसार !

एका शिव मंदिरामधील पुजारी श्री. कालुदासजी वैष्णव म्हणाले, ‘‘अनेक लोकांना भगवान शिवाशी संबंधित पूजेविषयी माहिती नाही. तुम्ही हे भित्तीपत्रक लावून फार चांगले कार्य केले.’’

फरिदाबाद (हरियाणा) येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

या वेळी शिवाच्या उपासनेचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व, शास्त्राप्रमाणे शिवाचे पूजन कसे करावे ?, ‘ॐ नम: शिवाय ।’ नामजप करण्याचे लाभ, तसेच कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप का करावा ? यांविषयी माहिती दिली.

डोंबिवली येथील सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अमृता संभूस यांचा महिलादिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने सत्कार !

सनातन संस्थेच्या डोंबिवली पूर्व येथील साधिका श्रीमती अमृता संभूस यांचा शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री. राजेश मोरे यांनी सत्कार केला.

फरिदाबाद (हरियाणा) येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

फरिदाबाद (हरियाणा) महाशिवरात्रीच्या निमित्ताने २२ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या पूनम अरोडा यांनी येथील पिंपलेश्वर मंदिरामध्ये येणार्‍या भाविकांना शिव उपासनेविषयी मार्गदर्शन केले.

‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस सनातनची ग्रंथसंपदा भेट !

सनातन संस्थेचे हितचिंतक, तसेच ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष श्री. किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, असे ग्रंथ भेट देण्यात आले. हे ग्रंथ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सुनील केतकर यांनी स्वीकारले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील तत्त्वनिष्ठ आणि झोकून देऊन सेवा करणार्‍या पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी (वय ४४ वर्षे) यांच्या सन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

पू. सुश्री (कु.) रत्नमाला यांच्यातील सेवाभावी वृत्ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. अनेक शारीरिक त्रास होत असतांनाही त्या भावपूर्ण, परिपूर्ण आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून सेवा करतात. त्या सध्या देवद आश्रमात सेवा करत आहेत. ‘दिसेल ते कर्तव्य’ असा त्यांचा भाव असून आश्रमातील अन्य सेवाही त्या पुढाकार घेऊन करतात. ‘आधी केले, मग सांगितले’, ही उक्ती त्यांच्याबाबत सार्थ ठरते.