रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात आल्यानंतर मला अनुभवायला मिळाले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेमुळे जे दैवी कार्य चालले आहे, ते काही सर्वसाधारण कार्य नाही.’ येथे आल्यानंतर माझ्या रोमारोमांत दैवी शांती देणारे दिव्य चैतन्य ओतप्रोत भरले गेले.’

राजकोट (गुजरात) येथील ‘पुनरुत्थान विद्यापिठा’चे माजी संयोजक पराग बाबरिया यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले. भारतीय शिक्षण पद्धतीनुसार येथे साधकांना घडवले जात आहे. हिंदु संस्कृतीविषयी चांगल्या प्रकारे समजावले जाते, हे पाहून चांगले वाटले’, असे श्री. बाबरिया म्हणाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची चैतन्यमय वातावरणात प्रतिष्ठापना !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली. सप्तर्षींच्या आज्ञेने प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

परात्पर गुरु डॉ. आठवलेगुरुजी यांनी धर्मासाठी केलेले हे कार्य अजरामर आहे आणि ते कार्य अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे. आश्रम पाहिल्यावर मला सकारात्मकता जाणवली. आश्रमातील सर्व साधकांचे चेहरे प्रफुल्लित दिसत होते.

राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघाचे अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

आश्रम पाहिल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. शुक्ला म्हणाले, ‘‘आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. येथील व्यवस्थापन पुष्कळ उत्तम आहे. आश्रमाला लवकरच दुसर्‍यांदा भेट देण्याची प्रबळ इच्छा आहे.’’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम सात्त्विक, पवित्र आणि दैवी आहे. येथे असतांना ‘मी सकारात्मक ऊर्जेच्या विश्वात आहे’, असे मला वाटले. मला सनातनच्या (राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या) कार्यात सहभागी व्हायचे आहे.’

(निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार यांची सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमास भेट !

सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून मला मनःशांती मिळाली आणि नवचैतन्यदायी ऊर्जा प्राप्त झाली.’

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

दहाव्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातीलच नव्हे, तर सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्यांचे प्रतिनिधी, राष्ट्रप्रेमी संस्था यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत होणे आवश्यक आहे. – सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज