पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांची गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
मु.पो. राख, तालुका पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके आणि त्यांची पत्नी सौ. संजना मांडके यांनी ५ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात.