मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

१० जुलै २०२२ या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. यानंतर सौ. लक्ष्मी नायक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन केले.

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरे !

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा ! प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे.

वर्धा येथे ३ ठिकाणी सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये देहली, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.