पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते !