सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भातील सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्‍यकता !

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्‍ध आहेत. साबण, उदबत्ती, त्रिफळा चूर्ण, दंतमंजन, उटणे, अत्तर, कापूर, कुंकू, अष्‍टगंध इत्‍यादी सात्त्विक उत्‍पादने बाहेरून बनवून घेतली जातात आणि त्‍यांची बांधणी (पॅकिंग) देवद आश्रमात केली जाते.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने नवे-पारगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

आपत्‍काळात रुग्‍णाच्‍या वेदना आणि आजार न्‍यून करण्‍यासाठी बिंदूदाबन शिकून घेणे आवश्‍यक आहे, यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने नवे पारगाव येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्‍यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने ‘क्राफ्ट पावरकॉन इंडिया लिमिटेड’ कंपनीमध्ये व्याख्यान !

सनातन संस्थेच्या वतीने रांझे गाव, भोर (पुणे) येथील ‘क्राफ्ट पावरकॉन इंडिया लिमिटेड’ या कंपनीमध्ये ‘गणेशोत्सवाचे अध्यात्मशास्त्र आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले !

ब्राह्मण संघाच्या वतीने संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे सन्मान !

‘ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका समारंभात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी म्हणून सनातनच्या संत पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) यांनाही सन्मानित करण्यात आले.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ४ ठिकाणी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनांचे आयोजन

प्रत्‍येक मनुष्‍याला आंतरिक सुख आणि शांती हवी असते. ही सुख-शांती मिळवण्‍यासाठी तो सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कार्यरत असतो. कधीही न संपणार्‍या सुखाला ‘आनंद’, असे म्‍हणतात.

वाराणसी (उत्तरप्रदेश) न्‍यायालयाच्‍या आवारात सनातन संस्‍थेच्‍या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे आयोजन

वाराणसी येथील न्‍यायालयाच्‍या आवारात ‘रुद्राभिषेक’ आयोजित करण्‍यात आला होता. यानिमित्त सनातन संस्‍थेच्‍या वतीने धर्मशिक्षण देणार्‍या फ्‍लेक्‍स फलकांचे प्रदर्शन लावण्‍यात आले.

मध्यप्रदेशातील देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट !

गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील शाळांमध्ये ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर व्याख्यान !

सनातन संस्थेच्या वतीने शरद नगर (श्रद्धागार्डन, पुणे) येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालय तसेच नवाळे वस्ती (श्रद्धागार्डन, पुणे) येथील प्राथमिक शाळेत ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी व्याख्यान घेण्यात आले !

सनातन संस्थेच्या वतीने ‘जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’ मध्ये ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !

सनातन संस्थेच्या वतीने “जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’ च्या विद्यार्थ्यांसाठी “तणावमुक्तीसाठी अध्यात्म” या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

पुणे जिल्ह्यात २ ठिकाणी बिंदूदाबन शिबिर पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांसाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड अशा २ ठिकाणी प्रत्येकी ३ दिवसांचे शिबिर पार पडले. पुणे येथे २२ ते २४ ऑगस्ट आणि पिंपरी-चिंचवड येथे २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत हे शिबिर पार पडले.