कंबोडियातील महेंद्र पर्वतावर उगम पावणार्या कुलेन नदीला तत्कालीन हिंदु राजांनी पवित्र गंगानदीचा दर्जा देणे आणि प्रजेला गंगानदीप्रमाणे पवित्र पाणी मिळण्यासाठी अन् भूमी सुपीक होण्यासाठी पाण्यात १ सहस्र शिवलिंग कोरणे
कंभोज देशाच्या उत्तरेला महेंद्र पर्वत आणि उत्तरेहून दक्षिणेकडे वहाणारी मेकांग नदी आहे, तसेच दक्षिणेला समुद्र आहे. विशाल कंभोज देशाची राजधानी महेंद्र पर्वतावर होती.