जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !

श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.

तणावमुक्तीसाठी अध्यात्माला पर्याय नाही ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘हेमा’ हायर सेकंडरी स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ वर प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत येथील हायर सेकंडरी स्कूल’ या शाळेत ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवन’ या विषयावर..

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध; साधक निर्दाेष मुक्त !

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. या निकालानुसार सनातनचे साधक निर्दाेषच होते, हेच आज सिद्ध झाले आहे. सनातन संस्था हिंदु आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे ‘अर्बन नक्षलवाद्यां’चे षड्यंत्र विफल झाले आहे.

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे ! – श्री. दादा वेदक, अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख, विश्‍व हिंदु परिषद

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांना पुन:प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे, तसेच पुनश्‍च प्राणप्रीय भारतमातेला जगाच्या कल्याणासाठी जगाच्या गुरुस्थानावर पुनर्स्थापित करण्याचे हे कार्य आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. महेंद्र उपाख्य दादा वेदक यांनी व्यक्त केले.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ‘सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी’ रविवारी सायंकाळी पुणे येथे ९ हजारांहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन गौरव दिंडी’ काढली. यात २० हून अधिक विविध संप्रदाय-संघटना सहभागी झाल्या होत्या.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील व्यावसायिक अभय निगम यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

मध्यप्रदेशमधील इंदूर येथील व्यावसायिक श्री. अभय निगम यांनी नुकतीच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले.

रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रवचन, नामजप ग्रंथप्रदर्शन कक्ष यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

या वेळी श्रीरामनवमीचे महत्त्व सांगून आणि श्रीरामनामाचा जप करून श्रीरामाची कृपा संपादन करण्याविषयी उपस्थितांना सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात सत्संगातील जिज्ञासूंनी प्रभु श्रीरामचंद्राची कृपा संपादन करण्यासाठी फलकप्रसिद्धीची सेवा तळमळीने केली.