बाली येथील जागृत ज्वालामुखी असलेला अगुंग पर्वत आणि समुद्रमंथनात दोरीचे कार्य केलेल्या वासुकी नागाचे बेसाखी मंदिर यांची वैशिष्ट्ये !
‘अगुंग पर्वत’ म्हणजे धगधगता आणि अखंड जागृत ज्वालामुखी आहे. येथे प्रत्येक ५-१० मिनिटांनी राखेचा विस्फोट होत असतो. ३ सहस्र १०५ मीटर उंच पर्वत असलेला हा ज्वालामुखी गेले वर्षभर जागृत आहे. त्यामुळे अनेक वेळा बाली द्वीपावर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. बाली येथील हिंदू या पर्वताला पवित्र मानतात.